CNNs (Convolutional Neural Networks) कसे कार्य करतात?
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
4d ago
डीप लर्निंगमधील CNNs (Convolutional Neural Networks) कसे कार्य करतात याचे एक विलक्षण प्रात्यक्षिक! हा व्हिडिओ दर्शवितो की प्रतिमा लहान करणे म्हणजे नेहमीच महत्त्वाचे तपशील गमावणे असा होत नाही. हे लक्षात घ्या की प्रतिमा खूपच लहान असूनही, आपण स्पष्टपणे पाहू शकतो की या चित्रामध्ये कुत्रा आहे! याचा अर्थ जर सुरुवातीच्या प्रतिमेच्या फक्त २५% भागामध्ये ती काय आहे, हे शोधण्यासाठी पुरेशी माहिती असेल तर आपण फक्त त्या भागावर लक्ष केंद्रित करू शकतो. अशा प्रकारे, आपल्याला CNN मध्ये संपूर्ण प्रतिमेसह कार्य करण्याची गरज नाही, ज्यामुळे गोष्टी अधिक सोप्या आणि जलद होतात. (संकलित)   ..read more
Visit website
कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशीलतेची शक्ती
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1w ago
➡️ नवकल्पनांना प्रोत्साहन: सर्जनशीलता नवीन कल्पना तसेच समस्यांवर उपाय सुचवते. ती व्यवसायांना स्पर्धात्मक बाजारपेठांमध्ये पुढे राहण्यास मदत करते. ➡️ समस्या चुटकीसरशी सोडवते: सर्जनशील विचारांना अद्वितीय दृष्टीकोन देते. ती आव्हानांचे संधीत रूपांतर करते. ➡️ उत्पादकता वाढवते: "आउट-ऑफ-द-बॉक्स" विचारांना प्रोत्साहन देते. कार्यक्षमता आणि उत्पादकता वृद्धिंगत करते. ➡️ अनुकूलता वाढवते: सर्जनशीलता बदल सहजतेने करण्यात मदत करते. तसेच कार्यात लवचिकता तयार करते. ➡️ सहयोग सुधारते: विविध कल्पना आणि संघशक्तीला प्रोत्साहन देते. अधिक समृद्ध, आणि अधिक प्रभावी परिणामांकडे नेते. ➡️ वैयक्तिक वाढीस चालना देते: सतत ..read more
Visit website
? वैद्यकीय क्षेत्राचे भविष्य: हेड ट्रान्सप्लांट आणि एआयचा वापर! ?
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1w ago
अशा जगाची कल्पना करा जिथे डोके प्रत्यारोपण ही केवळ साय-फाय संकल्पना नसून एक वैद्यकीय वास्तव आहे! एमआयटी न्यूजनुसार, भविष्यात हे शक्य होऊ शकते! हे जितके महत्त्वाचे वाटते तितकेच, अशा वैद्यकीय सीमांना पार करण्यात एआय ची भूमिका निश्चितच सर्वात महत्वाची असणार आहे. सर्जिकल प्लॅनिंग, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि पोस्टऑपरेटिव्ह केअरमध्ये एआय ची अचूकता ही भविष्यातील असे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. न्यूरल नेटवर्क सिम्युलेशनपासून रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियांपर्यंत, एआय आणि मानवी नवकल्पना यांचा समन्वय अभूतपूर्व वैद्यकीय प्रगतीचा मार्ग मोकळा करत आहे, असं दिसतं! संदर्भ: एमआयटी न्यूज. & ..read more
Visit website
स्टॅटिस्टिक्स
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
2w ago
स्टॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी म्हणजेच संख्याशास्त्राचा अभ्यासक्रमामध्ये शालेय जीवनात अथवा महाविद्यालयीन जीवनामध्ये माझा कधीही संबंध आला नाही. जवळपास १० ते १२ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मशीन लर्निंग शिकायला आणि शिकवायला सुरुवात केली तेव्हा संख्याशास्त्राची खऱ्या अर्थाने मला स्वतःला गरज भासू लागली. स्टॅटिस्टिक्स हे केवळ नावच ऐकले होते आणि असेही ऐकून होतो की ती गणिताचीच एक शाखा आहे. आज दशकभरामध्ये या विषयातील सर्व संकल्पना नक्की काय आहेत? त्यांचा व्यवहारिक जीवनामध्ये काय उपयोग होतो? याची व्यवस्थित माहिती झाली आहे कदाचित डेटा सायन्स या विषयाला हात घातल्यामुळे संख्याशास्त्र कोळून प्यायची सवय झ ..read more
Visit website
नाच गं घुमा
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1M ago
ठाण्यातल्या उच्चभ्रू रहिवासी भागामध्ये राहणारे त्रिकोणी कुटुंब. यातील राजा आणि राणी अर्थात नवरा आणि बायको दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबला आहेत. आणि त्यांची मुलगी शाळेमध्ये शिकतेय. अर्थात याच कारणास्तव त्यांच्या घरी घरकाम करण्यासाठी कामवाली बाई आहे. त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सात वाजल्यापासून. घरातली सर्वच कामे कामवाली बाई अर्थात आशाताई अगदी तन्मयतेने करतेय. दिवसातील बारा तास वेळ ती या घरात घालवते. अर्थात घराची सर्वच जबाबदारी तीच्याकडेच आहे.  ..read more
Visit website
काळाच्या संदर्भात
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1M ago
काळ अर्थात टाईम म्हणजे विज्ञानाला अजूनही सखोलपणे न समजलेली गोष्ट. आम्हाला वेळ कळते, असं म्हणणारी माणसं देखील काळाबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. याच काळावर आधारित लेखक बाळ फोंडके यांनी लिहिलेले आणि नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले हे पुस्तक, “काळाच्या संदर्भात”. बाळ फोंडके म्हणतात, काळाला सुरुवात व शेवटही नाही याची जाणीव होते तेव्हा तो गूढ, अतिवास्तववादी रूप धारण करतो. तो शाश्वत आहे. तो उलट्या दिशेने प्रवाहित होऊ शकणार नाही, यासाठी गणितशास्त्त्राप्रमाणे जरी काही कारण नसलं तरी त्याचा प्रवाह एकाच दिशेने भूतकाळातून भविष्याकडे आहे. ही विवेक शून्यता कमी होती म्हणून की काय अल्बर्ट आईन् ..read more
Visit website
चीप - अतुल कहाते
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1M ago
विसावं शतक हे संगणक अर्थात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचं शतक होतं. या क्रांतीने आज वापरात असलेली बहुतांश इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि उपकरणे जन्माला घातली. तंत्रज्ञानाचा वेग वाढवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. एकविसाव्या शतकातील संगणकीय तंत्रज्ञान याच इलेक्ट्रॉनिक क्रांतीवर आधारलेला दिसतं. मागील शतकातील या महत्त्वपूर्ण क्रांतीने संगणकाच्या मेंदूला अर्थात मायक्रोप्रोसेसरला जन्म दिला. आज वापरात येणाऱ्या संगणकासह इतर सर्व महत्त्वपूर्ण उपकरणांमध्ये मायक्रोप्रोसेसर चीपचा प्रामुख्याने समावेश असतो. अर्थात आजच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तो मेंदूच आहे, असे म्हणावे लागेल. आज वेगाने प्रगत होत असलेल्या कृत्रि ..read more
Visit website
मराठी भाषा धोरण
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
2M ago
मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाला आवडेल असेच भाषा धोरण महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले. त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन देखील. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये होत असलेली मराठी भाषेची अधोगती लक्षात घेऊन त्यासाठी पावले उचलणे अपरिहार्यच होते. म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची अंमलबजावणी करण्यासाठी जेवढा शासनाचा सहभाग असेल किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक सामान्य नागरिकांचा असायला हवा. कारण आज-काल मराठी भाषिक लोकच आपल्या भाषेला तुच्छ आणि दुय्यम समजायला लागलेले आहेत. हिंदी आणि इंग्रजी सारख्या परकीय भाषा मराठी भाषेवर अतिक्रमण कर ..read more
Visit website
जयहिंद पॉलीटेक्निक
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
2M ago
१९९९ यावर्षी अर्थात बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या तंत्रशिक्षण जीवनाची सुरुवात जुन्नरमधल्या जयहिंद पॉलीटेक्निक या महाविद्यालयातून झाली. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान म्हणजे काय? हे मला माहिती देखील नव्हते. परंतु महाविद्यालयीन जीवनात तंत्रज्ञानाच्या अ-आ-ईची सुरुवात झाली. आज त्याच महाविद्यालयात मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. खरंतर माझ्यासाठी हा अत्यंतिक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. मागील २५ वर्षांमध्ये मी ज्या गोष्टी मिळवल्या त्याची सुरुवात या भूमीतून झाली होती, याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना २५ वर्षांपूर्वीचा मी मला पुन्हा आठवला. माझ्या वैयक्तिक अनु ..read more
Visit website
स्माईल प्लीज
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
3M ago
नंदिनी ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि करिअरला वाहून घेतलेली प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. पतीबरोबर होणाऱ्या वारंवार कलहामुळे तिने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण अजूनही दोघांमध्ये कटूता नाही. दोघांची मुलगी असल्याने त्यांच्यात सर्वकाही सामंजस्याने सुरू आहे. प्रगतीच्या पायऱ्या चढत चढत नंदिनी यशाच्या शिखराकडे प्रवास करीत आहे. परंतु अचानक एका दिवसापासून ती छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते. कामाच्या व्यापात हे तिच्या फारसं लक्षात येत नाही. पण आपली मैत्रीण असलेल्या मानसोपचार तज्ञाबरोबर चर्चा केल्यानंतर तिला समजते की तिला डिमेन्शिया अर्थात विसरण्याचा आजार झालेला आहे. आणि तो अगदी सुरु ..read more
Visit website

Follow विज्ञानेश्वरी on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR