रोमहर्षक सामन्यात केकेआरचा मुंबईवर 18 धावांनी विजय, हर्षित राणा ठरला विजयाचा हिरो
Maha Sports
by Pushkar Pande
4h ago
आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केकेआरनं मुंबईवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना 16-16 षटकांचाच करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं 7 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सची टीम 8 गडी गमावून 139 धावाच करू शकली. हर्षित राणा कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं अखेरच्या षटकात नमन धीर (17) आणि तिलक वर्मा (32) यांची विकेट घेऊन सामना केकेआरच्या दिशेनं झुकवला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसलनंही 2-2 ..read more
Visit website
ईडन गार्डनवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; पावसामुळे 16-16 षटकांचा असेल सामना
Maha Sports
by Pushkar Pande
7h ago
आयपीएल 2024 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ईडन गार्डन मैदानावर सामना खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानावर बराच वेळ पाऊस पडत होता, त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. आता हा सामना 16-16 षटकांचा असेल. दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 ..read more
Visit website
रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी, आता ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व
Maha Sports
by Pushkar Pande
8h ago
आयपीएल 2024 च्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार रिषभ पंतला स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. पंत आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडणार आहे. हा सामना 12 मे रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात रिषभ पंतच्या अनुपस्थितीत अष्टपैलू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी याची पुष्टी केली. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत पाँटिंग म्हणाला, “उद्याच्या (12 ..read more
Visit website
टी20 विश्वचषकाचे सामने भारतात थेट कधी आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या
Maha Sports
by Pushkar Pande
8h ago
आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. त्यानंतर लगेच 2 जून पासून आयसीसी टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. यंदाच्या टी20 विश्वचषकाचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणार आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेला 5 जून पासून सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. तर पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूयॉर्क येथे रंगणार आहे. या बातमी द्वारे आपण जाणून घेऊया, टी20 विश्वचषकाचे सामने भारतामध्ये कधी आणि किती वाजता पाहता येणार. भारत आणि आयर्लंड यांच्यात 5 जून रोजी न्यूयॉर्क येथील नासाउ येथे लढत होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 ..read more
Visit website
“माझं काय आहे, हे तर माझं शेवटचं आहे”, रोहित शर्माचा केकेआरच्या प्रशिक्षकासोबत संभाषणाचा व्हिडिओ लीक
Maha Sports
by Pushkar Pande
9h ago
आयपीएल 2024 च्या आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ स्टेडियममध्ये सराव करत होते, तेव्हा मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा यानं कोलकाताचा प्रशिक्षक आणि त्याचा जुना मित्र अभिषेक नायर याची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणात मुंबई इंडियन्सचे सर्व गुपित उघड झाले आहेत. आयपीएल 2024 ..read more
Visit website
क्रिकेटमधील एका युगाचा अंत! महान गोलंदाज जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार अखेरचा कसोटी सामना
Maha Sports
by Pushkar Pande
10h ago
इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अँडरसन आपला शेवटचा कसोटी सामना या वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. क्रिकेटचा ‘मक्का’ म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर 10 ते 14 जुलै दरम्यान हा कसोटी सामना खेळला जाणार आहे. 41 वर्षीय जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवरच कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं इंग्लंडसाठी 187 कसोटी सामन्यांत 700 बळी घेतले आहेत. अँडरसन हा 700 कसोटी बळींचा महाकाय टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. यावर्षी भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत कुलदीप यादवला बाद करून त्यानं कसोटीमध्ये 700 ..read more
Visit website
गौतम गंभीरसमोर रडला केकेआरचा चाहता, हात जोडून केलं खास आवाहन; हा 50 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हालाही रडवेल
Maha Sports
by Pushkar Pande
12h ago
गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाल्यापासून संघानं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी गंभीर केकेआरसोबत मार्गदर्शक म्हणून सामील झाला. गौतम गंभीर कर्णधार असताना कोलकाता संघ 2012 आणि 2014 मध्ये दोनदा चॅम्पियन बनला होता. गंभीर 2018 पासून केकेआरपासून दूर होता. परंतु आता तो संघासोबत पुन्हा जोडल्या गेल्यानंतर केकेआरचं नशीब पालटलं आहे. आयपीएल 2024 ..read more
Visit website
गोळ्या झाडल्या…दगडं उचलले…आर्मीप्रमाणे ट्रेनिंग करूनही आयर्लंडकडून हारले; पाकिस्तानची क्रिकेट टीम सोशल मीडियावर खूप ट्रोल
Maha Sports
by Pushkar Pande
12h ago
पाकिस्तानच्या क्रिकेट टीमनं आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी खूप तयारी केली होती. संघानं यासाठी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये चक्क सैन्याचं ट्रेनिंग देखील घेतलं होतं. मात्र बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 5 ..read more
Visit website
ब्रेकिंग बातमी! दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचं निलंबन! बीसीसीआयची मोठी कारवाई
Maha Sports
by Pushkar Pande
13h ago
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे रिषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. याशिवाय त्याला 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याचाच अर्थ आता रिषभ पंत रविवारी (12 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. रिषभ पंतचा चालू आयपीएलमधील आचारसंहितेअंतर्गत हा तिसरा गुन्हा होता, ज्यामुळे त्याला 30 लाख रुपये दंड आणि एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनच्या उर्वरित खेळाडूंना वैयक्तिक 12 ..read more
Visit website
‘थाला’ला भेटायला चाहता सरळ मैदानात! ‘माही’च्या पाया पडला अन्….हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहाच
Maha Sports
by Pushkar Pande
14h ago
भारतात महेंद्रसिंह धोनीची फॅन फॉलोइंग किती आहे, हे सर्वांनाच माहित आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं तर तेथे धोनीसाठी चाहत्यांमध्ये पागलपण दिसून येतं. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर देखील असंच दृष्य पाहायला मिळालं. शुक्रवारी (10 मे) अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 59 ..read more
Visit website

Follow Maha Sports on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR