“नरेंद्र मोदीचं २०२९ पर्यंत पंतप्रधानपदावर राहणार”
News Danka
by Team News Danka
10m ago
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाला असून त्यांनी शनिवार, ११ मे रोजी केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार असून त्यांना राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल आणि त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील,” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. या वक्तव्यावर आता खुद्द अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी हैदराबाद येथे पत्रकार ..read more
Visit website
छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान
News Danka
by Team News Danka
10m ago
छत्तीसगडमध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्याची कामगिरी पोलिसांनी केली असून ऐन निवडणुकीच्या वातावरणात झालेली ही कारवाई खूप महत्वाची आहे. गांगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह बिजापूर येथे आणण्यात आले आहेत. शुक्रवारी गांगालूर परिसरातील जंगलामध्ये नक्षलवाद्यांचे एसजेसी लेंगु, त्यांचे प्रमुख पापराव, दरभा विभागाचे चैतू यांच्यासह आणखी काही मोठ्या नक्षलवादी तेथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नक्षलवादी आहेत का, याची खात्री केली. त्यानंतर दंतवाडा, ..read more
Visit website
सलीम मलिकची विशेष रजा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
News Danka
by Team News Danka
1h ago
सुप्रीम कोर्टाने २०२० च्या हिंदुविरोधी दंगलीप्रकरणी सलीम मलिक उर्फ ​​मुन्नाची विशेष रजा याचिका फेटाळली आहे. विशेष रजा हा भारतीय राज्यघटनेच्या कलम १३६ अंतर्गत उपलब्ध असा एक उपाय आहे, जो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणाने पारित केलेल्या किंवा केलेल्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी रजा (परवानगी) मंजूर करण्याचा विशेष अधिकार प्रदान करतो. उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, सलीम मलिक आणि इतर व्यक्तींनी तंबू आणि बॅनर लावले होते आणि निदर्शनास उपस्थित असलेल्या गर्दीला द्वेषपूर्ण विधाने दिली होती. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना ध ..read more
Visit website
तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल भविष्य सांगू लागले!
News Danka
by Team News Danka
1h ago
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच प्रचाराला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी राजकीय भविष्येही वर्तविण्यास प्रारंभ केला. कोण पंतप्रधान होणार, कोण तुरुंगात जाणार, कोणता पक्ष निवडणूक जिंकणार किंवा कुणाचा पराभव होणार अशी अनेक भविष्ये त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केली. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा निवृत्त होणार याचेही भाकीत यानिमित्ताने करून टाकले. त्यांनी म्हटले की, २०२५मध्ये मोदी हे निवृत्त होतील. तेव्हा ते ७५ वर्षांचे होणार आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन हे नेते ७५ व ..read more
Visit website
ट्रकच्या धडकेत गाडी उलटी आणि बाहेर पडले सात कोटी!
News Danka
by Team News Danka
1h ago
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच सुरक्षा यंत्रणा आणि निवडणूक आयोग डोळ्यात तेल घालून नाकाबंदी करून रोकड जप्त करण्याचे कामही करत आहे. अशातच मध्ये प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात सात बॉक्समध्ये ठेवलेली ७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका अपघातामुळे संबंधित वाहनात रोकड असल्याचे समोर आले आहे. नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रकने धडक दिल्यानंतर छोटा हाती (छोटा टेम्पो) पलटी झाला. त्यानंतर या गाडीमधून रोकड असलेले सात कार्डबोर्डचे बॉक्स नेले जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. ही गाडी विजयवाडाहून विशाखा ..read more
Visit website
निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे जाणार अज्ञातवासात
News Danka
by Team News Danka
1h ago
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागणार आहे, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच सुनावले आहे. आपल्या भाषणांमधून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच ..read more
Visit website
‘करो या मरो’ सामन्यात ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी
News Danka
by Team News Danka
1h ago
आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली पुढचा सामना आरसीबी विरुद्ध खेळणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो, नाहीतर सामान भरो’ अशा काहीशा स्थितीत आहे. संघ अडचणीत असताना संघाचा म्होरक्या ऋषभ पंत हा सामना खेळणार नाही. त्यामुळे दिल्लीच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर स्लो ओव्हर रेटच्या दंडामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईमुळे तो आरसीबीविरुद्ध खेळू शकणार नाही. प्लेऑफच्या शर्यतीत आपल्या सरदारालाच शस्त्र खाली ठेवावे लागल्यामुळे दिल्लीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला स्लो-ओ्हर रेटसाठी दोषी ठरवले होते. यापूर्वी पंतने ..read more
Visit website
भाजपाचे तिकीट नाही, पण वरुण गांधी प्रचारात भाग घेतील!
News Danka
by Team News Danka
1h ago
भारतीय जनता पार्टीचे खासदार वरूण गांधी यांची उमेदवारी डावलल्यानंतर त्यांची आई मेनका गांधी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, पिलभीत मधून वरून गांधी यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर भाजपच्या बद्दल नेहमी वरूण गांधी यांनी टिपणी केली होती. त्यांची उमदेवारी नाकारून तिथे उत्तर प्रदेशचे माजी खासदार जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मेनका गांधी म्हणाल्या, सरकारच्या विरोधात बोलल्यामुळे आपल्या मुलाचे तिकीट कापले आहे. त्या म्हणाल्या मला विश्वास वाटतो की पक्षाच्या तिकिटाशिवाय वरुण गांधी मतदारसंघ ..read more
Visit website
विश्वंभर चौधरींनी पळ काढला
News Danka
by Team News Danka
1h ago
‘निर्भय बनो’च्या माध्यमातून सभा घेत लोकशाही वाचविण्याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, केंद्र सरकार, महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार यांच्यावर टीका करणारे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी १८ मेपर्यंत सभा घेतल्यानंतर या सगळ्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. विश्वंभर चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, १८ मे रोजी निर्भय बनोची शेवटची सभा मुंबईत होईल. त्यानंतर सार्वजनिक आयुष्यातून संपूर्ण निवृत्ती घेण्याचा मी विचार करत आहे. तब्येत, व्यवसाय, परिवार यांना पूर्ण वेळ देण्याचा विचार आहे. या पोस्ट ..read more
Visit website

Follow News Danka on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR