ब्रेकींग : चाकूचा धाक दाखवत ६० हजारांची रोकड घेवून तरूणाला लुटले; दोन जणांना अटक
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
52m ago
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्ज वसुली करून मोटारसायकलने निघालेल्या तरूणाला रस्त्यावर आडवत चाकूचा धाक दाखवत त्याच्याजवळील ६० हजारांची रोकड हिसकावून घेतली. एवढेच नाही तर मिरचीची पुड तरूणावर फेकून मारहाण करून दोघजण फरार झाल्याची घटना १० मे रोजी दुपारी १ वाजता नेरी-दिगर रोडवर घडली होती.या गुन्ह्यातील दोनजणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर हिरासिंग चव्हाण वय २५ रा. गोंदेगाव ता.जामनेर हा तरूण आयडीएफसी बँकेच्या कर्ज वसूली विभागात नोकरी करत आहे. दरम्यान, शुक्रवारी १० मे रोजी सागर चव्हाण यांनी कर्जवसुलीसाठी ..read more
Visit website
शेतीच्या वाटणीवरून भावासह पुतण्याकडून तलवार व कोयत्याने वार
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
52m ago
चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथे शेताच्या वाटणीच्या हिस्याच्या वादावरून एकाला भाऊ व पुतण्यांकडून धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवार ९ मे रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १० मे रोजी दुपारी ४ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कांतीलाल तुळशीराम राठोड वय-४८ रा. वलठाण ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून कांतीलाल तुळशीराम राठोड व त्यांचा भाऊ चांगदेव तुळशीराम राठ ..read more
Visit website
जन्मठेपची शिक्षा झालेल्या प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून कायम जामीन मंजूर
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
2h ago
नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रसिध्द एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रदीप शर्मा यांना लखनभैया फेक एन्काउंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १९ मार्च रोजी त्यांना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता दोन महिन्यापूर्वी प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून त्यांना कायम जामीन मंजूर झाला आहे. प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावली पार पाडली असता प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे आत्मसमर्पण होण्याची अट सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प् ..read more
Visit website
शरद पवारांसोबत राहून ही अजित पवारांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही – राज ठाकरे
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
14h ago
पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील महायुतीचे उमेदवार भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणावरून टीका घेतली यासोबतच त्यांनी अजित पवार यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही असे म्हणत त्यांची स्तूतीही केली. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. हे जातीपातीचे विष १९९९ सालापासून कालवायला सुरूवात झाली आहे. माझे अजित पवारांबद्दल अनेक मतभेद असतील. पण अजित पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केले नाही. हे विष तोपर्य ..read more
Visit website
माजी आ. महेंद्रबापू पाटील समर्थकांसह भाजपमध्ये दाखल !
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
15h ago
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्रबापू पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. आज जळगावात केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी एरंडोलचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, त्यांचे पुतणे नरेंद्रसिंग पाटील तसेच अन्य समर्थकांनी ना. गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महेंद्रबापू आणि त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, ना. अनि ..read more
Visit website
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मूलभूत सोयी सुविधा पुरवणार
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
15h ago
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विविध स्वरूपाच्या सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर, स्तनदा माता, लहान अपत्ये असलेल्या महिला मतदारांसाठी पाळणाघर, गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रांग, मदतीसाठी आशा वर्कर त्याचप्रमाणे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, मतदान केंद्र बाहेर मंडपाची व्यवस्था अशा स्वरूपाच्या सोयी सुविधा जिल्हा प ..read more
Visit website
पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेहुण्याला जावयांने संपवले
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
15h ago
वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाशिम जिल्हयात कौटूंबिक वादामुळे खून झाल्याची घटना घडली आहे. पतीच्या सतत त्रासाला कंटाळल्यामुळे पत्नीने घर सोडून माहेरी गाठले होते. पत्नीने माहेरी आपल्या घरी यावे असा पतीचा आग्रह होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेहण्यावर जावयाने जीवघेणा हल्ला केला असता उपचारादरम्यान मेहूण्याचा मृत्यू झाला आहे. नारायण सांडे हे मृत मेहुण्याचे नाव आहे. तर विजय खेकाळे हे हल्लाखोर जावईचे नाव आहे. मालेगाव तालुक्याच्या वाघी गावातील जावाई विजय खेकाळे हा नेहमी आपल्या पत्नीला दारू पिऊन त्रास देत होता. याच कारणाने पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर विजय यांनी फोन करुन पत्नीच्या भावाला ..read more
Visit website
रेल्वेलाईन ओलांडत असताना रेल्वेने धडक दिल्याने तरूणी ठार
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
15h ago
वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे लाईन ओलांडत असताना २२ वर्षीय तरुणीला रेल्वे गाडीने धडक दिल्यामुळे तरूणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी आठ वाजेच्या दरम्यान वरणगाव रेल्वे स्थानकापासून काही अतंरावर घडली असून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. याबाबत भुसावळ लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वाती भिमराव तायडे (वय २२, रा. तासखेडा ता. रावेर ह.मु. वामन नगर वरणगाव) ही तरुणी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान रेल्वे स्थानकाच्या काही अतरांवर रेल्वेलाईन ओलांडत असतांना नागरपूरकडून येणारी रेल्वे गाडी क्रंमाक ००१४१न ..read more
Visit website
वाघुर धरणात बुडून डोहरी येथील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
17h ago
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातून दुदैवी बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील डोहरी गाव येथील दहावीत शिकणाऱ्या तुषार कमलाकर कोळी (वय १५) या विद्यार्थ्यांचा वाघुर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी घडली आहे. डोहरी गावात राहणारा तुषार कमलाकर कोळी हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत संध्याकाळच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या वाघूर धरणात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चोघे मित्र खोल पाण्यात गेले. मात्र यावेळी अचानक तुषार कोळी हा अतिखोल पाण्यात गेल्यामुळे तो बुडाला व यावेळी मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल ..read more
Visit website
भुसावळ शहरात परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रा
Live Trends News
by जितेंद्र कोतवाल
17h ago
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरांमध्ये सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. अष्टभुजा मंदिर येथून भगवान श्री परशुरामाच्या मूर्तीचे पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभा यात्रेत पारंपारिक वेशभूषेत महिलांनी लेझीम खेळून जल्लोष साजरा केला. याशिवाय ढोल पथक व ध्वज पथकानेही सर्वांचे लक्ष वेधले. म्युनिसिपल पार्क येथील श्रीराम मंदिरात या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली असून मोठ्या संख्येने सकल ब्राह्मण समाज बांधव या शोभा यात्रे सहभागी झाले होते. The post ..read more
Visit website

Follow Live Trends News on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR