पुण्यात धावणार दुचाकी रुग्णवाहिका; वाहतूक कोंडीवर अनोखा उपाय
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
2h ago
पुणे | शहराचा वाढता विस्तार, वाहनांची संख्या यासह सर्व बाबी लक्षात घेता नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडल्याचे चित्र वारंवार दिसते. यामुळे आता दुचाकी रुग्णवाहिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता पुण्यातील रस्त्यांवर दुचाकी रुग्णवाहिका धावणार असून, वाहतूक कोंडीतूनही त्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवतील. एखाद्या रुग्णाला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात नेण्यासाठी पहिली पाच ते सात मिनिटे हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. पुण्यातील वाहतुकीची खराब स्थिती पाहता हा वेळ तब्बल ३० ते ४० मिनिटांवर पोहोचला आहे. र ..read more
Visit website
महाविकास आघाडीच्या उमेदवाराने घेतले अजित पवारांचे आशीर्वाद; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
2h ago
पिंपरी -चिंचवड | मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील कधीकाळी अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. राष्ट्रवादीच्या बंडानंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना मावळमधून उमेदवारी महाविकास आघाडीने दिली. आता त्यांना राष्ट्रवादीचे आधीचे नेते अन् उपमुख्यमंत्री अजित पवार एका समारंभात भेटले. त्यावेळी त्यांना नमस्कार करून त्यांनी आशीर्वाद घेतले. संजोग वाघेरे यांनी लग्नाच्या व्यासपीठावर अजित पवारांचा आशीर्वाद घेतल्याने संजोग वाघेरे यांना छुपा पाठिंबा नाही ना? अशी शहरात चर्चा रंगली आहे. पिंपरी विधानसभेचे आमदार ..read more
Visit website
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘तो’ मेसेज; मैत्रिणीने केला मोठा खुलासा
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
4h ago
Gurucharan Singh ..read more
Visit website
“विरोधकांच्या छातीत धडकी भरली म्हणून…” खासदार कोल्हेंचे प्रत्युत्तर
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
4h ago
शिरूर | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे मतदारसंघाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. डॉ. कोल्हे यांनी २०१६ मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता. अर्ज वैध ठरल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार ..read more
Visit website
अशी आहे सोलापूर लोकसभेची ‘ग्राउंड रियालिटी’
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
22h ago
सोलापूर | नरेंद्र मोदी यांचा हिंदुत्ववादी चेहरा आणि विकास कामांची जोरदार जाहिरात बाजी याच्या जोरावर राम सातपुते यांच्या विजयाचे दावे केले जात आहेत. नरेंद्र मोदी यांचा आश्वासन चेहरा हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख तोंडवळा आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या आमदारांचा पाठिंबा आणि लाभार्थ्यांची, हिंदुत्ववादी जनतेची मते हे त्यांचे प्रमुख शक्ती स्थळ आहे. पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख सह कार्यरत असलेली प्रचार यंत्रणा आणि बडे बडे नेत्यांचे कॅम्पेन हे राम सातपुते यांच्या जमेची बाजू आहे. तर दुसरीकडे यापूर्वीचे भाजपाने दिलेल्या दोन्ही उमेदवारांची निष्क्रियता तसेच भाजपाने ग्राउंड लेव्हलवर दाख ..read more
Visit website
“८३ वर्षाच्या बापाला फिरून त्यांना मतं मागावी लागतात..” चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
1d ago
रायगड | रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी रायगड जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आदिती तटकरे, रूपाली चाकणकर आणि आधी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केली आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर बारामतीमधील विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आम्ही रायगडचा गुलाल उधळायला येणार आहोत, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समाचा ..read more
Visit website
“८४ वर्षांचं म्हातारं लय खडूस…” सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
1d ago
कोल्हापूर | रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारात बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरुन उरला, असे वक्तव्य रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले. गेल्या ७० वर्षांपासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवारांसारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली. अजून काय म्हणाले सदाभाऊ खोत ? “लोकसभेची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा म्हणजेच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. मतदारसंघात शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ऐकू येतील. शरद पवारांचं वय ..read more
Visit website
देशभरातील WhatsApp बंद होणार? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं?
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
1d ago
whatsapp in delhi high court ..read more
Visit website
मुल होत नाही म्हणजे तृतीयपंथीयाचा.. विवाहितेसोबत संतापजनक कृत्य, संभाजीनगर हादरलं
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
1d ago
छत्रपती संभाजीनगर | राज्यात जादूटोणा करून शोषण करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकारांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात भरडल्या जात आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे महिलेचा अमानुष छळ करण्यात आला आहे. तुझ्या अंगात तृतीयपंथीयाचा आत्मा आहे, त्यामुळे मुलबाळ होत नाही.. असे सांगून महिलेचा छळ करण्यात आला आहे. मूलबाळ होण्यासाठी तो आत्मा बाहेर काढण्याचा बहाणा करून एका विवाहितेला काठीने मारहाण करून अंगावर खिळे मारून तिचा अमानुष छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे हा ..read more
Visit website
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जाहिरात फलकांची १५ दिवसात तपासणी होणार
Rashtrasanchar
by Bhakti Chalak
2d ago
पुणे | शहरात काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाने वाघोली येथे मोठा जाहिरात फलक चारचाकी वाहनावर कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आकाशचिन्ह विभागाने १५ दिवसांच्या आत शहरातील सर्व जाहिरात फलकांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांसह, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महापालिकेच्या पाच परिमंडळांना देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात पावसाळ्यात झाडे, तसेच जाहिरात फलक कोसळण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. मागील वर्षी देहूरोड येथे जाहिरात फलक पडून काही नागारिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महापालिकेने दरवर्षी जाहिरात फलक नूतन ..read more
Visit website

Follow Rashtrasanchar on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR