नगर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच विषारी औषध घेण्याचा प्रयत्न
Nagar Chaufer
by admin
15h ago
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून बायको आणि मुलींना मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस अटक करत नाहीत यावरून एका व्यक्तीने नगर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.  उपलब्ध माहितीनुसार , रमेश काळे ( राहणार देऊळगाव सिद्धी तालुका नगर ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून गायरान जमिनीच्या वादातून काही जणांनी रमेश काळे आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केलेली होती. पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक केली नाही तसेच काहीही कारवाई केली नाही असा आरोप रमेश काळे यांनी केलेला आहे .  रमेश काळे हे सोमवारी 15 ..read more
Visit website
25 जुलैपासून राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा
Nagar Chaufer
by admin
15h ago
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता आरक्षण बचाव जनजागृती यात्रा काढण्यात येणार असून कुणबी मराठा आरक्षणात सगळे सोयरे ही भेसळ ठरत आहे. कुणबी व्यक्तींना पूर्वीपासूनच आरक्षण आहे. ज्यांनी अर्ज केला नाही त्यांनाही सरकार प्रमाणपत्र देत आहे त्यामुळे या बाबी शोधून दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे म्हणून 25 जुलैपासून राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे.  एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात माहिती देताना ,’ 26 जुलै 1902 ..read more
Visit website
महाराष्ट्र्रात डॉक्टरने शेअर ब्रोकरचे अपहरण केल्याची घटना
Nagar Chaufer
by admin
15h ago
शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीनंतर अपेक्षित असा नफा मिळाला नाही म्हणून झालेला तोटा भरून काढण्यासाठी एका ब्रोकरचे त्याच्याच कारमध्ये अपहरण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आलेला आहे. तीन जणांनी या ब्रोकरचे अपहरण केले आणि अमरावती इथे नेऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. महाराष्ट्र्रात डॉक्टरने शेअर ब्रोकरचे अपहरण केल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.  संबंधित शेअर ब्रोकर यांचे नाव नितीन भास्कर सरोदे असे असून पुण्यात ते काही वर्षांपासून शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करतात. आरोपी डॉक्टर सुहास भांबुरकर , अल्पेश गुडदे आणि भूषण तायडे ( सर्वजण राहणार अमरावती ) अशी आरोपींची नावे आहेत.&nbs ..read more
Visit website
सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील गवळीवाडा इथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Nagar Chaufer
by admin
15h ago
लक्ष्मी आई यात्रेनिमित्त नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील गवळीवाडा इथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  अखंड गवळी बांधवांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 21 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत या रक्तदान शिबिराचे आयोजन सिविल हॉस्पिटल जवळील लक्ष्मी आई मंदिर येथे करण्यात आल्याची माहिती अजय शहापूरकर यांनी दिलेली आहे.  The post सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील गवळीवाडा इथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन first appeared on ..read more
Visit website
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली
Nagar Chaufer
by admin
15h ago
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असा परिणाम न आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या संवाद व मीडिया विभागातर्फे राज्य प्रवक्त्यांसाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय विशेष कार्यशाळेत उत्कर्षाताई रुपवते सहभागी झालेल्या होत्या.  वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रवक्त्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मोठ्या प्रमाणात जनसंपर्क अभियानास सुरुवात देखील करण्यात आलेली आहे.  ..read more
Visit website
सुर्वेन्द्र गांधी यांना 60 दिवसात 50 लाख रुपये भरण्याचे आदेश 
Nagar Chaufer
by admin
15h ago
नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात 291 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झालेला असून या प्रकरणातील आरोपी असलेले सुर्वेन्द्र गांधी यांना 60 दिवसात 50 लाख रुपये भरण्याचे आदेश केलेले आहेत . नवी दिल्ली येथील न्यायालयाने सातत्याने न्यायालयात उपस्थित न राहणे , चालढकल करणे , वेगवेगळ्या भूमिका घेणे , कोर्टात गैरहजर राहणे तसेच दंडाची रक्कम न भरणे याविषयी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे.  ..read more
Visit website
पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले
Nagar Chaufer
by admin
1d ago
पूजा खेडकर आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड वादात अडचणीत सापडलेले आहे .पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. केंद्रीय यंत्रणेकडून त्यांच्या विविध स्वरूपांच्या चौकशीला सध्या सुरुवात करण्यात आलेली असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव मूळ गाव असलेल्या ग्रामस्थांनी मात्र खेडकर कुटुंबावर अन्याय केला जात आहे यासाठी साखळी उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे.  भालगाव येथील सरपंच पोपट रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत खेडकर कुटुंबीय यांच्या समर्थनार्थ ठराव मांडण्यात आला त्यावेळी बाळू खेडकर , पार्वती खेडकर , विकास पारखे , अनिता रोकडे यांच्यासोबत इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.&n ..read more
Visit website
नगर जिल्ह्यात गोळ्या बिस्कीटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला अडवलं अन ..
Nagar Chaufer
by admin
3d ago
नगर जिल्ह्यात गोळ्या बिस्कीटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला अडवलं अन त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने , एक लाखांची रोकड आणि मोबाईल असा ऐवज लंपास केला. सदर व्यवसायिक यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी असलेले परवाना प्राप्त रिवाल्वर काढले मात्र चोरट्यांनी रिवाल्वर खाली पाडले आणि ते देखील पळवून नेले. नगर सोलापूर रोडवरील वाटेफळ येथील ही घटना आहे.  शिरूर तालुक्यातील गोळ्या बिस्कीटचा व्यवसाय करणारे भुसार व्यापारी नगर तालुक्यात प्रॉपर्टीच्या व्यवहारासाठी गेलेले असताना नगर सोलापूर रोडवरील वाटेफळ इथे नऊ जणांच्या टोळीने त्यांना मारहाण केली आणि लुटमार करून फरार झाले.  ..read more
Visit website
नगर शहरात एका शिक्षिकेचा वारंवार पाठलाग करून .. 
Nagar Chaufer
by admin
3d ago
नगर शहरात एका शिक्षिकेचा वारंवार पाठलाग करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन तरुणांच्या विरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला या सावेडी उपनगरात राहतात. आरोपी दिग्विजय गणेश कवडे ( राहणार प्रोफेसर कॉलनी चौक सावेडी ) आणि सलमान रॉय अशी गुन्हा झालेल्या आरोपींची नावे आहेत.  सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी दिग्विजय याची तक्रारदार महिलेसोबत ओळख झालेली होती त्यानंतर तो वारंवार या महिलेसोबत संपर्क साधायचा. महिलेने अनेकदा विरोध केला मात्र तरी देखील आरोपी सातत्याने तिचा पाठलाग करत असल्याने अखेर फिर्यादी महिलेने पोलिसात धाव घेतली.  Th ..read more
Visit website
डॉक्टर सुजय विखे यांच्या फेर मतमोजणीच्या मागणीवर निलेश लंके म्हणाले की ..
Nagar Chaufer
by admin
3d ago
डॉक्टर सुजय विखे यांच्या फेरमतमोजणीच्या मागणीवर निलेश लंके म्हणाले की , ‘ ईव्हीएम मशीनबाबत वास्तविक आम्ही तक्रार करायला हवी होती. सध्या देशात तुमचे सरकार आहे आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्वास दाखवत असाल तर याचा अर्थ तुम्ही कुणाशीच प्रामाणिक नाहीत. तुमच्या आजोबांनी देखील तेच केलेले आहे ,’ असे म्हटलेले आहे.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर मतांची फेरमोजणी करण्यासाठी भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली होती त्यावर पारनेर तालुक्यातील हंगे इथे लंके बोलत होते.  ..read more
Visit website

Follow Nagar Chaufer on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR