तुझी डायरी गझल
पवन तिकटे
by Unknown
7M ago
 आर्त मनाने गाणे म्हणते तुझी डायरी तुला माहिती नाही रडते तुझी डायरी जेव्हा अपुले भांडण होते.. तू रुसल्यावर आधाराला सोबत असते तुझी डायरी नैराश्याला दुखणे माझे  ..read more
Visit website
लेक सासरला जाता
पवन तिकटे
by PAWAN TIKTE
1y ago
  ..read more
Visit website
घे भरारी
पवन तिकटे
by PAWAN TIKTE
1y ago
 नाव - घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र... स्थापना - 22 ऑक्टोबर 2017 संस्थापक - १) ॲड. तेजस गायकवाड                  २) पवन तिकटे                  ३) पुरुषोत्तम चंद्रात्रे चिन्ह - समाज माध्यम संकेतस्थळ -  फेसबुक - घे भरारी साहित्य समूह महाराष्ट्र इन्स्टाग्राम - ghe_bharari_sahitya_samuh ..read more
Visit website
१ले घे भरारी साहित्य संमेलन - नाशिक २०१८
पवन तिकटे
by PAWAN TIKTE
1y ago
  पहिले घे भरारी युवा साहित्य संमेलन नाशिक 2018    कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय सभागृह नाशिक इथं 22 जुलै 2018 रोजी पार पडलेल्या घे भरारी साहित्य समूहाच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अविस्मरणीय सुवर्णक्षण..... उद्घाटक :- दीक्षा ताई लोंढे ( नगरसेविका नाशिक) स्वागत अध्यक्ष :- भीमराव कोते पाटील संमेलनाध्यक्ष :- तुकाराम धांडे युवा कवी संमेलन अध्यक्ष :- सागर काकडे प्रमुख उपस्थिती ;- चंद्रकांत वानखेडे, संजीवनी राजगुरू, दीप पारधे, शार्दुल ठाकुर, डॉ अशोक शिंदे ◆ आयोजक • तेजस शिवाजी गायकवाड • पवन तिकटे • पुरुषोत्तम चंद्रात्रे    ..read more
Visit website
खोपा
पवन तिकटे
by PAWAN TIKTE
1y ago
  तिचा मंजुळ आवाज,गुंजे राघूच्या या कानी बोलावती भेटावया,मैना गाऊनिया गाणी... हुंदका गुंतला तिचा,कंठ सुकला सुकला राघू काहून तू असा,माझ्या संग रे फुगला... पेरू जांबाच्या झाडाले,राघू मारतोया चोचा मैना इनवणी करे,येरे परतुनी खोपा... लागे भांडण वाढीस,मैना रुसली खोप्यात राघू खुपसूनी बैसे,चोच तयाची जांबात  ..read more
Visit website
अ. भा. म. साहित्य संमेलन आणि आम्ही तिघे
पवन तिकटे
by PAWAN TIKTE
1y ago
अखिल भारतीय साहित्य संमेलन या आधी कधीही गेलो नाही, पण नाशिक ला असल्याने जाण्याचा मुख्य हेतू म्हणजे तेजस आणि पुरु ची भेट, आणि बरेच घे भरारी  परिवारातील भेटणार होते आम्हा तिघांना एकत्र  आणि गझल कट्टा म्हणून जाणं गरजेचंच होत. सलग दोन दिवस चालणारा गझल कट्टा आणि गझल कट्ट्याच्या हॉलमध्ये सतत वाजणाऱ्या टाळ्या, शिट्ट्या प्रत्येक जणांच्या काळजातून येणारी  वाहवा ची दाद अजूनही कानात गुंजत आहे.. सर्वच मुशायरे जबरदस्त झालेत.. मनोमन वाटत रहायच हा वेळ संपूच नये असच ऐकत राहावं सर्वांना.. 3 ..read more
Visit website
नात्यात एक अपुल्या साधा करार ठेवू
पवन तिकटे
by PAWAN TIKTE
1y ago
गझल... नात्यात एक अपुल्या, साधा करार ठेवू हातात हात ठेवू, प्रीती अपार ठेवू... दुःखास पाहुनी जर, रडलो उगाच आपण सोसेल काळजाला, तितकाच भार ठेवू... डोळ्यात बोलणारी, आहेत आसवेही  ओतून तेल डोळा, डोळे तयार ठेवू... न्यायालयात त्यांच्या, खोटा करार चालू आश्वासने नकोशी, शब्दांत धार ठेवू... माखून टाकले मी, रक्तात हात माझे नेण्यास देह त्यांचा, खांदेच चार ठेवू... थोडे जगावयाचे, होते मला इमानी आयुष्य व्यर्थ झाले, आता उधार ठेवू... मी ढाळलेत अश्रू, चिंतेमधे तिच्याही आता उगाच का, मी दावे हजार ठेवू... ● पवन  ..read more
Visit website
डोळ्यामध्ये तिच्याही
पवन तिकटे
by PAWAN TIKTE
1y ago
गझल.... डोळ्यामधे तिच्याही, उजळून पाहिले मी प्रतिबिंब ते स्वतःचे, जवळून पाहिले मी... डोळे मिटून माझे, आली कुठून स्वप्ने आयुष्य मग तयांशी, चिघळून पाहिले मी... केली कधी सुखाने, माझी तमा जराशी आक्रोश वेदनांचे, उधळून पाहिले मी... ती कौतुके नकोशी, सखये तुझ्या मुखाने प्रत्येक वेदनेला, चघळून पाहिले मी... दाटून ऊर येतो , स्वप्नात भेट होते कंठात आसवांना, मिसळून पाहिले मी... दुःखास टाळले मी , मौनास पाळले मी माझ्याच सावलीला , कवळून पाहिले मी... पवन बालाराम तिकटे ..read more
Visit website

Follow पवन तिकटे on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR