झाडे
ख्वाबिदा
by Shrutkirti
3M ago
जानेवारी आला आणि ॲास्ट्रेलियन ओपन सुरू झाली. वय वाढले की, रुटिनमधे गुंतत गेले की आणि आपले आवडते प्लेअर रिटायर झाले की खेळातील रस कमी होतो तसेच या गेम्सकडे दुर्लक्ष झाले होते. अचानक काल बातम्यांमध्ये जोकोविचच्या आवडत्या झाडाची बातमी झळकू लागली. मेलबर्नच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये त्याचे एक लाडके झाड आहे. त्याला भेटून , त्याच्याशी बोलून “ He keeps himself grounded “ हे ऐकतांनाही भारी वाटत होते. रोजच्या कामाच्या रस्त्यात खुप गर्द झाडी आहे. एक झाड जातानांची कितीही ही घाई  ..read more
Visit website
पाऊस पडतोय
ख्वाबिदा
by Shrutkirti
3M ago
पाऊस पडतोय, पडतोच आहे केंव्हाचा आवाजात काय सापडतेय? शोध  चालूच आहे तेंव्हा पासूनचा असं म्हणतात; गाणार्याला ऐकू येते गाणे, कविला कविता आणि काहींना खळखळून हसणे  कान देवून ऐकतेय, डोळे मिटून ऐकतेय पावसाने कुजबुजत तरी म्हटले आहे कां गाणे? कधीतरी वाचलेले, कुठेतरी ऐकलेले पावसाने जे गायलेले आणि काळ्या काळ्या ढगांनी ते लिहलेले आज आजूनही पाऊस गातच नव्हता, धबाधबा कोसळतांना सुर होता विसरला कुठेतरी वाचलेले, कधीतरी ऐकलेले पाऊस गातो गाणे;   मग हळूच खोटे वाटू लागले पावसाला एकदा सांगितले, मनालाही समजावले विश्वास असा डगमगणार नाही माझा,  ..read more
Visit website
वाबी साबी
ख्वाबिदा
by Shrutkirti
4M ago
उन्हाळा आला, सुट्टी आली की प्रवास, भेटीगाठी, गमती जमती याबरोबरच आवरा आवरी नावाचे भूत माझ्या मानगुटीवर बसते.   स्प्रिंग क्लिनिंग या गोंडस नावाने ते पार ताबा घेते. सुट्टीत करूया, म्हणून बाजूला ठेवून दिलेले हे काम, जाता येता “सुट्टी आली “ असे कधी हळूच कधी ओरडून ओरडून सांगायला लागते.  मग एक दिवस त्याचा मुहूर्त सापडतो. पसारा काढायला फार मजा येते. एक करता करता, दहा गोष्टी आठवतात आणि उठून चालताना,  ..read more
Visit website
दिवाळीची पणती
ख्वाबिदा
by Shrutkirti
5M ago
  कॅलेंडर आले की, सणवार आणि विकएंड हे गणित मांडायला सुरुवात होते.  पुण्यात असताना सुट्टी बुडाल्याचे होणारे दुःख, इथे आनंदात रूपांतरित कधी झाले  ते कळलेच नाही. यावर्षीही दिवाळीत शुक्रवार, शनिवार, रविवार आलेत आणि त्यातही भाकड दिवस आलाय म्हटल्यावर आनंदच आनंद.  ..read more
Visit website
शॅापिंग कार्ट
ख्वाबिदा
by Shrutkirti
6M ago
  ॲानलाईन शॅापिंगच्या चकव्यामध्ये फिरतांना मधूनच ध्यानीमनी नसलेले काहीतरी दिसते आणि मग वाया घालवलेला वेळ इतकाही  ..read more
Visit website
भान
ख्वाबिदा
by Shrutkirti
6M ago
  आजूबाजूला बघतांना कळतं; खंबीर बनायचंच असतं, थोडं अवघड असतांनाही सगळं छानंच असतं   मृदू , कोमल ,हळूवार ; मन जपायला शिकलेलंच असतं, कारण आधीचं गिरमिटलेलं सगळं पुसायचं पण असतं   मेहनत, काम , कष्ट ; गरजेला सगळं करायचंच असतं, पण स्वप्न पाहातांना मात्र दिवस न् रात्रीचं गणितंच नसतं   धटाशी धट आणि खटाशी खट ,  जगराहाटीला धरून वागायचं असतं, स्वतःसाठी  मात्र स्वतःच ताठ कण्याने उभं रहायचंही असतं   चुकलं की सुधरवायचं असतं; हरलं की पुन्हा नव्याने खेळायचं असतं, कुठेतरी कधीतरी विश्वास ठेवून बघायचंही असतं   ..read more
Visit website
माझी उशी
ख्वाबिदा
by Shrutkirti
6M ago
 ही जी उशी आहे ना , कापूसच नाही तीच्या आत पण भरली आहेत स्वप्नं मात्र  सात…. कधी रंगीबेरंगी, कधी धवल तर कधी कधी अगदीच सरळ उशीची आणि स्वप्नांची; खुप गाढ मैत्री डोकं ठेवताच दोघांच्या गप्पा रोज रात्री डोळे ही मग यात होतात सामील, मिटून घेतलेल्या पापण्या मेंदूला ठेवतात गाफील स्वप्नांचा हात धरून डोळे खुप लांबवर जातात, दमून भागून गजराआधी बरोब्बर परत येतात चुकूनमाकून कधीकधी तिथेच रमतात, परत आल्यावर स्वप्ने उशीवरच रेंगाळतात उघड्या डोळ्यांना दिसतात ती खरी, पण हाती लागतील तर स्वप्ने ती कसली? उशीवरची स्वप्ने लपतात उशीत परत; उघडे डोळे आणि मन, मात्र असतात त्यांनाच शोधत   ..read more
Visit website
काहीतरी राहिलंय!
ख्वाबिदा
by Shrutkirti
7M ago
गणपती गौरींच्या आधीचा वीकएंड आला आणि हळूहळू चाललेल्या तयारीने वेग घेतला. सगळे बिट्स अँड पिसेस जुळून यायला लागले. घर आवरलेले दिसायला लागले आणि सणाचे वातावरण जाणवायला लागले. तशा याद्या, पुन्हा पुन्हा केलेल्या याद्या, खरेदी हे सगळे बरेच आधी चालू असतेच पण वेग येतो तो दोन दिवस आधीच. मेंदू आणि हात भराभर चालतात आणि to do  ..read more
Visit website
नीलमोहोराचे झाड
ख्वाबिदा
by Shrutkirti
8M ago
फुलांनी बहरलेलं नीलमोहोराचे झाड, जाता येता हसतं ओळखपाळख नसतांनाही, दोन मिनिटे रस्त्यात थांबवतं मी ही शिष्टासारखी,  उगीच थोडीशी हसते त्याचे फुललेले रूप डीपी वर चिकटवून, ओळख साजरी करते फुले गळली, फांद्या उरल्या तरीही झाडाने रोजच,  ओळखीच्या खुणा मिरवल्या मीच आपल्या नादात, माझी रोजचीच घाई उगीचच जातायेता एकदा झाडाला बघून जाई झाड तिथेच, तसेच उभे शिशिरामुळे निष्पर्ण  ..read more
Visit website
जमतंय…
ख्वाबिदा
by Shrutkirti
8M ago
  अरे वा! जमलं की तुला पटकन म्हणाले कोणीतरी भारी वाटतेच मग, विषय असला अगदी आलाणा फलाणा तरी   पण खरे उत्तर शोधलेच तर; जमवण्याचा प्रयत्नच चालू असतो ना दिवसभर धडपडून, पडझडून कसेही करून “जमले की!” हे एकच वाक्य मनाशी धरून जमलंय का मग खरंच? प्रश्न पडला कि संपलच   रोजच मग, जमण्याच्या रस्त्यावर चालत चालत दूर मनातल्या मेंदूतल्या जंगलात हरवत जिथे दिशा एकच, वाटा मात्र अनेक रस्ता अंधारा मात्र मधूनच सुर्याचा किरण एक झाडापानांतून झिरपणारा सुर्यप्रकाश हाताला धरून मार्गांवर चालवतो सावकाश   ..read more
Visit website

Follow ख्वाबिदा on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR