पाणीदार दम
Sahitya Chaprak
by चपराक
1d ago
गावात नेत्यांची सभा होती. संध्याकाळी सहाची वेळ असली तरी या नेत्याने दिलेला गुंड प्रवृत्तीचा उमेदवार आणि त्याचे काही कार्यकर्ते उत्साहात तयारी करत होते. तशी गावात या नेत्याविषयी प्रचंड नाराजी होती. निवडणुकीचा अपवाद वगळता नेते कधीही गावात फिरकत नसत. गावातले सगळे प्रश्न ‘जैसे थे’ होते. या नेत्याचे जे चार कार्यकर्ते होते त्यांचीच मनमानी चालायची. त्यांच्या दहशतीमुळे सगळे गपगार असायचे. यावेळी मात्र गावानं एकत्र येऊन ठरवलं की, काहीही झालं तरी या नेत्याच्या उमेदवाराला मत द्यायचं नाही. उमेदवार गावातलाच असल्याने तोंडदेखल हजर राहणं गरजेचं होतं. मत मात्र नाही म्हणजे नाहीच! शहरातील धरणाचं पाणी… चपराक प्रका ..read more
Visit website
…आणि पवारांना तिकीट मिळाले
Sahitya Chaprak
by चपराक
1d ago
शरद पवार 1967 साली सर्वप्रथम वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी उमेदवार ठरवण्याचा आणि तो जाहीर करण्याचा अधिकार काँगेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांचा असायचा. प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांना निवडणूक लढवण्याची विचारणा केली. त्यावेळी पवार युवक काँग्रेसचे काम सक्रियपणे करायचे. पवारांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना बारामतीतून कडाडून विरोध झाला. सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, “आम्ही 12 ..read more
Visit website
‘डमी’ उमेदवारांमुळे मिळाला विजय
Sahitya Chaprak
by चपराक
4d ago
ही गोष्ट आहे मराठवाड्यातील एका दुर्गम भागातील. तिथे एक ठेकेदार रस्त्यांची कामे करत होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायातून त्यांनी त्यांची उद्यमशीलता दाखवून दिली होती. नेकीने व्यवहार करताना आपण भले आणि आपले काम भले असा त्यांचा खाक्या! सामाजिक, राजकीय कार्याशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचे वडील मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी असायचा. त्यावेळी पदवीधर शिक्षक मतदारसंघातून त्यांच्या मुलाने निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता. मुलानं सांगितलं की, ‘‘मला माझा व्यवसाय करू द्या. राजकारणात मला रस नाही.’’ वडील मात्र ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं ..read more
Visit website
निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? – किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील
Sahitya Chaprak
by चपराक
6d ago
पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक, राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत. काकडे लिहितात, मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती. त्याचा निरीक्षक म्हणून मी हिंगणे परिसरात प्रचार करत होतो. सायंकाळी साडेसहाची वेळ होती. तेथील नगरसेवक शैलेश चरवड यांच्यासोबत आम्ही तुकाईनगर येथील झोपडपट्टीत गेलो. तेथे गेल्यावर नगरसेवक चरवड प्रत्येकाला सांग ..read more
Visit website
स्थानिक विरुद्ध उपरा : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील
Sahitya Chaprak
by चपराक
6d ago
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार राम सातपुते यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सोलापूरच्या संस्कृतीविषयी लिहून सातपुते हे बाहेरचे म्हणजे उपरे असल्याचे सांगितले. त्यावर सातपुते यांनीही त्यांना प्रतिउत्तर देत आपण सोलापूर जिल्ह्यातीलच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याचे आणि सोलापूरशी आपला नियमित संपर्क असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आणि एका ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी ही लढत आहे. दोघेही युवा नेते आहेत आणि आता लोकसभेसाठी आपले भवितव्य आजमावून पाहत आहेत. यानिमित्त स्थानि ..read more
Visit website
फाईल आणि दादूमियाँ : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील
Sahitya Chaprak
by चपराक
1w ago
दादूमियाँ उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ. स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी यांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. नरेंद्र मोदी दादूमियाँच्या घरी येणार्‍या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात एमआयटीने आयोजित केलेल्या ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहर्‍यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी ते ‘माणूस’ साप्ताहिकात ‘दिल्लीतला महाराष्ट्र’ हा स्तंभ लिहायचे. तो वाचून यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना फोन केला आणि भेटीची इच्छा व्यक्त केली. दादूमियाँ म्हणाले, ‘‘ ..read more
Visit website
उद्योजकांना वापरा, कामे सामान्यांची करा! | किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील
Sahitya Chaprak
by चपराक
1w ago
बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्यातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून जायचे. ते केंद्रीय संरक्षण उत्पादन मंत्री होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे ते चिरंजीव. काकासाहेब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चांगली मैत्री होती. एकदा बॅरिस्टर गाडगीळ दिल्लीला गेले असता डॉ. आंबेडकरांना भेटले. त्यावेळचा किस्सा ते रंगवून सांगायचे. त्यांच्या चेहर्‍यावर किस्से सांगताना कायम एक मिश्किल हास्य असायचं. बाबासाहेबांनी त्यांना विचारलं, ‘‘तू काय काम करतोस? दिल्लीत कसा आलास?’’ बॅ. गाडगीळ म्हणाले, ‘‘मी अजून शिकतोय. एका उद्योजकाच्या खाजगी विमाना ..read more
Visit website
माय लेक -राजेंद्र दिघे
Sahitya Chaprak
by चपराक
3w ago
माय नितळ गोडवा लेक साखर पाडवा माय प्रेमाचा निर्झर लेक आनंदी पाझर माय कष्टाची भाकर लेक लाडाची कदर माय सुंदर आभाळ लेक नितळ निर्मळ माय अंगणी तुळस लेक घराची कळस माय प्रेमाचा सागर लेक कुळाचा जागर माय वाढता मांडव लेक नात्यांचा सांकव माय गोकूळ आरसा लेक वंशाचा वारसा माय सुखाचा आगर लेक दुःखाला झालर -राजेंद्र दिघे चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com ..read more
Visit website
सरीवर सरी – श्रद्धा बेलसरे-खारकर
Sahitya Chaprak
by चपराक
3w ago
सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांचे हे नवे सदर या अंकापासून देत आहोत. बेलसरे यांचे ‘मोरपंखी’, ‘आजकाल’ आणि ‘फाईल व इतर कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘टिकली तर टिकली’ हा ललितलेखसंग्रह आणि ‘सोयरे’ हा व्यक्तिचित्रणाचा संग्रह प्रकाशित आहे. त्यांचे ‘डबल बेल’ हे एस.टी.मधील अभिनव उपक्रमाचे अनुभवकथनही प्रकाशित आहे. त्यांनी अनेक मान्यवर वृत्तपत्रांसाठी सदर लेखन केले असून त्यांना ‘कवी कट्टी’, ‘पद्मश्री विखे पाटील’, दूरदर्शनचा ‘हिरकणी’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या आठ मुख्यमंत्र्यांबरोबर काम ..read more
Visit website
उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वाचे राज्य… महाराष्ट्र! – संजय सोनवणी
Sahitya Chaprak
by चपराक
3w ago
जसे माणसाला एक व्यक्तिमत्त्व असते तसेच व्यक्तिमत्त्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तिच्या जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्त्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्त्व ही बाब मानवी जीवनात महत्त्व घेऊन बसते. व्यक्तिला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामागे त्याचे एकुणातील व्यक्तिमत्त्व जबाबदार असते. राष्ट्र आणि राष्ट्रातील राज्याचेही तसेच आहे. त्यांनाही व्यक्तिमत्त्व असत ..read more
Visit website

Follow Sahitya Chaprak on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR