मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...
चमनचिडी
by Milind
4M ago
राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत न ..read more
Visit website
गण्या
चमनचिडी
by Milind
1y ago
गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चार ..read more
Visit website
कोविडेच्छा बलियसी
चमनचिडी
by Milind
1y ago
परीक्षा झाली ना की आम्ही सगळे मित्र नाईट आउट करणार आहोत - बरं बाबा परीक्षा संपली की आधी ती सगळी रद्दी घालून ये - हो गं आई बाबा, सुट्टी लागल्या लागल्या मी आधी लायसन्स काढणारे बरं का - हं लायसन्स मिळाल्यावर मी सगळ्या गाड्या चालवणार हां  ..read more
Visit website
कॅमेरा
चमनचिडी
by Milind
1y ago
सध्याच्या ह्या करोना विषाणूच्या कुलूपबंद परिस्थितीत रोज सकाळी उठल्यानंतर 'आता काय' हा प्रश्न आ वासून उभा असतो. ऑफिसचं थोडंफार काम असतं, नाही असं नाही. पण ते झाल्यानंतर काय हा प्रश्न राहतोच. टीव्ही पाहा, झाला पाहून. गाणी ऐक, झाली ऐकून. व्यावसायिक विषयाचा अभ्यास करू का?  ..read more
Visit website
पक्षी उडोनि जाई...
चमनचिडी
by Milind
1y ago
 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  ..read more
Visit website
वर्दीतल्या माणसाच्या नोंदी
चमनचिडी
by Milind
1y ago
 सदानंदची आणि माझी गेल्या जवळजवळ पन्नास वर्षांची मैत्री आहे. प्राथमिक शाळेत आम्ही दोघं एका वर्गात होतो. आमची घरंही अगदी जवळ होती. त्यामुळे नंतर शाळा बदलल्या तरी संपर्क टिकून होता. पुढे १९८७ साली आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. त्याकाळी आजच्यासारखी माध्यमं नसल्यामुळे सहज संपर्क होत नसे. तसाच आमचाही संपर्क तुटला. अधूनमधून त्याच्याबद्दल काही कळत असायचं. तो आयसीडब्ल्यूए करत होता हेही माहीत होतं. अचानक एक दिवस  ..read more
Visit website
विस्कटलेला अल्बम
चमनचिडी
by Milind
1y ago
खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  ..read more
Visit website
दुरावा
चमनचिडी
by Milind
1y ago
काल अनेक वर्षांनी अली भेटला. खूप गप्पा मारल्या. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. - प्राथमिक शाळेत असताना वर्गात इम्रान तांबोळी होता. आमची सात आठ जणांची टोळी होती. आम्ही सगळेच एकमेकांच्या घरी जायचो. आमचे सगळ्यांचे आईवडील सगळ्यांना ओळखायचे. सगळ्यांच्याच आया पोरं घरी आली आहेत म्हणल्यावर हातावर खाऊ ठेवायच्या. काहीच वेगळं नव्हतं.  - माझ्या आजोबांचे एक मित्र होते. रत्नागिरीचे होते. नझीमखान चाफेकर नाव होतं. मुसलमानी पद्धतीची खुरटी दाढी सोडल्यास बाकी रंगरूपानं नझीमखान ऐवजी नारायण चाफेकर वाटायचे.  ..read more
Visit website
गझलशाळेत डोकावताना
चमनचिडी
by Milind
1y ago
 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  ..read more
Visit website
मेरा साया साथ होगा
चमनचिडी
by Milind
1y ago
परवा ३१ तारखेला तिथीनं माझ्या आयुष्यात घडलेल्या या सत्यघटनेला चौतीस वर्षं पूर्ण झाली...  १९८८ सालच्या पाडव्याच्या आदल्या रात्रीची ही गोष्ट आहे. सहा आठ महिन्यापूर्वीच मी सीएची आर्टिकलशिप सुरू केली होती. कामानिमित्त बरेचवेळा बाहेरगावी जावं लागायचं. पण दुसऱ्या दिवशी पाडव्याची सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो.  ..read more
Visit website

Follow चमनचिडी on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR