“आत्मविश्वास”
तेजोमय
by nileshsakpal
4M ago
तालेवार जगणे ज्यांचे, लखलाभ ही चंदेरी दुनिया त्यांना! माती फासून माथ्यावरी, आमचे ताटवे भेदती आभाळांना! लागता अहंतेचा लळा, नसे मात्रा छिद्र पडल्या जहाजांना! विखार शरमला विषाचा, शब्दरुप मिळता कपटी विचारांना! दुःख असावे मलमली, महाली विनासायास झुरणार्‍यांना! कृतघ्न म्हणावे जगाला, दृष्टी छेदूनी आरसे विकणार्‍यांना! अलौकिक होता विजय, तो आनंद काडीमोल गुलामांना! कोण शहीद सीमेवरती, काय फरक पडतो निर्वासितांना! दुर्मिळ आणि दुरापास्त, औषध नाही आमच्या स्वभावांना! गळ्यात पडू वा लाथाडू, जुमानत नाही कुणा सावकारांना! व्यर्थ भय मोह-बंधनांचे, वेळ येता फिरवू या ग्रहतार्‍यांना! सशक्त आमचे वज्रबाहू, पाजू पाणी वाटेती ..read more
Visit website
“पुनर्जन्म”
तेजोमय
by nileshsakpal
4M ago
गरजत होते पण कळत नव्हते, खूप दाटले तरी बरसत नव्हते, नवेच ढग असावे आजकालचे, दारातूनी पुढे ते सरकत नव्हते! झिरपत होते पण मुरत नव्हते, दुःख मलमली ते संपत नव्हते, आणाभाका नुसत्या कसल्या, तेल संपूनी दिवे विझत नव्हते! अवगत होते पण वळत नव्हते, अन् गुंत्यावाचून करमत नव्हते, विषाद माळले जरी धाग्यातूनी, तुटुदे म्हणूनीही ते तुटत नव्हते! वरचढ होते पण जिंकत नव्हते, शत्रू माझे एवढेही सरळ नव्हते, घमासान झाले जरी आता इथे, शत्रूविना कुणी जिवलग नव्हते! अवखळ होते पण सहज नव्हते, माझे मीपण मज गवसत नव्हते, ग्रीष्मात ओलावा आणला कुणी, कोरड्या परसास उमगत नव्हते! अवघड होते पण अटळ नव्हते, मृत्यूस काळ, वेळ, प्रहर नव्हते ..read more
Visit website
शून्य झालेल्या आठवणीमध्ये वर्तमानातील एखादी ठेच अं...
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
शून्य झालेल्या आठवणीमध्ये वर्तमानातील एखादी ठेच अंगार फुंकुन जाते अन भुतकाळाचा वणवा क्षणार्धात आपल्याला गुरफटुन टाकतो! वाट कितीही ओळखीची असली तरी चुकामुक होऊ लागते, आरशातील प्रतिबिंबाशीदेखील नजरानजर होत नाही.. आपलीच नजर आपल्याला आरपार छेदुन जाण्याचा प्रयत्न करते.. आपली विचारांची तोफ आपल्याला एखाद्या उंच सुळक्यावर नेऊन ठेवते… आपले अस्तित्व काडीमोल वाटुन अंतरी असलेल्या कधीही न पुटपुटलेल्या शब्दांचे दडपण खोल दरीस आव्हान देऊ लागते.. निस्वार्थपणा वागण्यात असला तरी जेव्हा कृतार्थपणा मुळापर्यंत झिरपत नाही तेव्हा अहंकार अनाहुतपणे वर्तमानावर तरंगू लागतो.. तेव्हा होणारी खळबळ ही स्वत:च्या विनाशाचे कारण अ ..read more
Visit website
अंधार
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
रात्रीस असणारी चंदेरी किनार शोधण्यासाठी अन अंधाराचा माग घेण्यासाठी हातात दिवा असणे केवळ निरर्थकच! अंधाराचा वेध घेण्याचे वेड सहजासहजी मिळत नाही.. अंधारात स्वतःला झोकुन अंधारापलिकडे जाण्यासाठी किंवा अंधाराचे आयाम शोधण्यासाठीची आस जागृत होणे, अंधाराचा दूत होऊन उजेडाला साद घालण्याची मोहिनी ती वेगळीच! अंधाराचे हात, पाय, कान, डोळे सगळे काही म्हणजे अंधारच! अंधारच सुरुवात अन अंधारच शेवट, सर्व काही पोटात घेणारा अवलीया म्हणजे अंधार! डोळ्यांनी दिसणारा अंधार, अंतरंगात असणारा अंधार अन एखाद्या विचारात असणारा अंधार हा वेगळाच! गर्तेत हरवल्यानंतर शेवटच्या हताशपणामुळे अन विवशतेमुळे आलेले सुन्न टोक म्हणजे अंधार ..read more
Visit website
“चैत्रसृजन” येई नभातुनी आवाज, जरी वाटे पलिकडचा कंप...
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
“चैत्रसृजन” येई नभातुनी आवाज, जरी वाटे पलिकडचा कंपने उठती अंतरात, रिता आभास मौनाचा कवेत निर्माणाचे गुज, डोळ्यांत चंद्र आशेचा ढगांचे गायन अंबरात, सडा अंगनी नक्षत्रांचा सावलीस हवा चेहरा, नी आधार अंधाराचा! दीपमाळ साज करी, टिळा लावी उजेडाचा! माग काढती पापण्या, या अश्रुंतल्या सलाचा! कोणास सांग भेटावे? बाजार उठता बिंबांचा! धैर्य राखा पायवाटांनो, सुक्काळ हा रस्त्यांचा! जुने म्हणजे जर्जर नाही, लाभता घन अमृताचा! सप्तरंगी न्हाले शिवार, भास तुझ्या कटाक्षाचा! आज चैत्रसृजन घडले तुझा पदर मोगर्‍याचा! कळे द्यायचेच राहिले, होता लेखा संचिताचा केले सोहळे भक्तीचे, भाव नेणता शबरीचा? चल पुन्हा फेर धरुया, गाऊ महिमा ..read more
Visit website
भलावण!
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
भलावण! भलावण भलत्या भुतांची, वेशीवर लटकणार्‍या कथांची! नी हर दोन श्वासांमध्ये, क्षणभर मरणार्‍या माणसांची! तुंबल्या डोहातील तरंग, आळवतील गीते सागराची! रक्तास डोळ्यांत आणता, बदलते वहिवाट विद्रोहाची! लल्लाटी तख्त जे भुषविती, त्यांची रहगुजर उसनवारीची! भरजरी दुःखास ते पाळती, ज्यांची छप्परे चंद्र-चांदण्यांची! जपा तुमचे स्वप्नांचे इमले, आली मिरवणुक प्रस्थापितांची! वळता मुठी, झुकले मुंडके, गुलामांनो याद ठेवा लिलावाची! मरावे आपल्याच बाणाने, नी शिक्षा मिळावी जन्मठेपेची! कुणास जेतेपद दाखवावे, शत्रूत जेव्हा नांदी स्वकीयांची! लाटेस लाभला तो किनारा, तीच वेळ होती लाट संपण्याची! जरी म्हणावे सारे व्यर्थ होते, ..read more
Visit website
तळ
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
सगळे झुगारुन, निघावे, तळ गाठावा! सहवास गोठण्याआधी, थोडे जड व्हावे! तरंगांशी भांडण नाही, क्षणिक शहारा, नकोसा वाटतो! भोवताली, नजरभर निळाई, किरणांचा सारीपाट, खेळावासा वाटतो! दडपण, घुसमट, सगळे शून्य होऊन, सर्वांग पाणीमय, नव्हे पाणीच होऊन जावे! जाणिवा, नेणिवा, आठवणींचे वळ, बंधनांचे साखळदंड, मायेचे अवजड उच्छवास, संशयाचा गोंगाट, उद्याची उर्मी, आजचे भकासपण, विरघळुन जावे! स्वतःला स्वतःमधुन वजा करुन, अथांग, खोल सागरास सादर व्हावे, लाटांचे अभिष्टचिंतन स्वीकारावे, आणि, तळाकडे निघावे! — निलेश सकपाळ ०९ जून २०२२ ..read more
Visit website
अस्वस्थता
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
आजूबाजूची अस्वस्थता आपल्यामध्ये नाही म्हटले तरी कणाकणाने झिरपत असते, आपल्यामधील अस्वस्थततेत भर टकत राहते, कधी वर्तमानपत्रांतून, कधी दूरचित्रवाणीवरुन तर कधी इतर समाजमाध्यमांमधून आपल्यापर्यंतचा पल्ला पार होतो. एखाद्या नाजूक क्षणी, आपण बेसावध असताना ही सभोवतालची अस्वस्थता आपल्याशी सलगी करते. ही अस्वस्थता किंवा याला entropy असे म्हणतात, याची व्याख्या म्हटली तर  degree of disorder or randomness in the system. आणि ही अस्वस्थता नेहमी चढ्या क्रमाने वाढतच असते. अगदी आपल्या क्षणिक वैचारिक स्पंदनांमुळे या अस्वस्थतेमध्ये किंवा  entropy ..read more
Visit website
चौकट
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
..read more
Visit website
जर आणि तर
तेजोमय
by nileshsakpal
1y ago
नश्वरतेचा शिक्का घेऊन जन्माचे देणे मिरवत राहतो, दूर एका काळ्या काळाच्या पुलावरुन मृत्यू विकट हास्य करुन पाहत असतो, सूर्याला जगणे वहावे किंवा अंधाराला शरण जावे की फक्त तटस्थ भुमिका घेऊन उजेड आणि सावलीची सीमारेखा ठरवत जावे, कळत नाही! कळत नाही की आपल्याला न कळणे हेसुद्धा कुणी कळणार्‍याने आपल्याला हे सारे नकळत वाटावे असे पेरले नसेल कशावरुन, प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर आणि प्रश्नाने भांडावुन सोडलेले असताना लौकिक अर्थाने, भौतिकतेच्या नियमाप्रमाणे आपल्या जिवनामध्ये जाणवणारा अथवा मुल्यांकन करता येईल असा कोणताच फरक पडत नाही, नाही म्हंटले भावार्थामध्ये, मानसिक पटलावर उठलेल्या तरंगांचा तेव्हा ठाव कळतो क ..read more
Visit website

Follow तेजोमय on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR