'मध्यरात्रीनंतरचे तास'
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
'मध्यरात्रीनंतरचे तास' मूळ लेखिका - सलमा मराठी अनुवाद - सोनाली नवांगुळ ' साहेब हे न्या, साहित्य अकादमी मिळाला आहे याला ' असं त्यांनी सांगितलं. काहीतरी सोपं द्या वाचायला असं म्हणत आपल्या अभिरुचीवर शंका घेण्याचं समाधान देण्यापेक्षा ती कादंबरी मी साशंक मनाने विकत घेतली. ' मध्यरात्रीनंतरचे तास ' या कादंबरीच्या मुखपृष्ठावरून काहीतरी गंभीर असणार हे निश्चित होतं. सुरुवातीलाच प्रस्तावना वाचली माझ्या आवडत्या लेखिका कविता महाजन यांची, या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार आहेच, पण कविता ताईंच्या प्रस्तावनेनंतर मनाला पटलं की दर्जाच्या बरोबरीने धगधगता जाळ असणार या पुस्तकात. कादंबर ..read more
Visit website
नदीष्ट - मनोज बोरगावकर
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
या नद्या काही माझी पाठ सोडत नाहीत आणि ' गोदावरी ' तर नाहीच नाही. हा सिलसिला सुरू झाला गावी नदीत पाय मुरगळण्यापासून, तेव्हा नदीला लाखोल्या वाहिल्या नसल्या तरी थोडासा खट्टू मात्र झालो होतोच. त्यानंतर काही दिवसांनी ' गोदावरी ' नावाचा नदीवर बेतलेला नितांत सुंदर सिनेमा पाहिला. त्यानंतर नर्मदामाईचा  ..read more
Visit website
ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम - कविता महाजन
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
'ब्र' आणि 'भिन्न' वाचून आवडलं तरी माझ्या आवडत्या लेखिकेच्या या कादंबरीच्या वाट्याला जायला एवढा वेळ का लागला हे कळलं नाही. 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' या कादंबरीत कविता महाजन कहाणी उलगडतात पद्मजा सप्रेची. बरीच कहाणी पद्मजा सप्रेच्या प्रथम पुरुषी निवेदनाच्या ढंगाने जाते. मग आपल्याला कळतं की पद्मजा ही सिनेमा - नाट्य क्षेत्रातली एक अभिनेत्री आहे,  ..read more
Visit website
त्या पूलावर
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
'त्या पूलावर ...' ती आली होती, डोळ्यात वादळ घेऊन, मात्र होती निश्चल. फिक्या चेहऱ्यावर होतं, निश्चयी लालगडद लिपस्टिक. विचारांचा पारवा घुमत होता, तिच्यात भरलेल्या रीतेपणात, तिथल्या कासावीस शांततेत. मौनाच्या पूलावर उगाच रेंगाळलो, मागेपुढे .. अंदाज घेत ... पण पावलं रेटली नाहीत, तिच्या अवकाशापर्यंत. राहू दे निदान हा पूल शाबूत, तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या शक्यतेचा. उसवलं होतं काहीतरी आत, माझ्या कोषानी सांधता न येणारं असं. धग जाणवत होती, श्वासाचे विस्तव धुमसण्याची, ती निर्धोक होती तिथे, तरी, डोळ्यांचे पहारेकरी होते, माझ्या हालचाली टिपत. का वाटत होतं तिला? मी सांगावा हक्क, तिच्या बेनामी जखमांवर. क्षित ..read more
Visit website
तत्वमसि - ध्रुव भट्ट
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
तत्वमसि  मूळ गुजराथी कादंबरी लेखन - ध्रुव भट्ट मराठी अनुवाद - अंजनी नरवणे ' तत्वमसि ' उपनिषदातलं खूप गहन अर्थ असलेलं, वरकरणी एक शब्द पण वास्तवात एक महावाक्य. नावापासूनच वेगळेपण जपणाऱ्या ध्रुव भट्ट लिखित या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी फार उत्तम मराठी अनुवाद केला आहे. भारतीय संस्कृतीत नेमक्या कुठल्या धाग्याने विविध धर्माचे , पंथाचे, जातीचे, स्तरातले लोक बांधले गेले आहेत यावर सर्वांगाने विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं. अध्यात्मिक विचार करायला लावणारं पुस्तक असूनही हे बोजड प्रवचनाने, वा चमत्काराने भारलेलं नाही.  ..read more
Visit website
माचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
'माचीवरला बुधा' हे पुस्तक वाचलं आणि वाटलं आपण किती गुंतून जातो व्यवहारिक जगात. शेवटच्या श्वासापर्यंत प्लॅन्स करत राहतो नानाविध, शरीरात नळ्या वगैरे खुपसून, औषधं, इंजेक्शन्स घेऊन जगायची खटपट. जगायचं कुठवर आणि कशासाठी याचे चुकलेले हिशोब आपण घेऊन बसतो. मग हा देह कुठल्याशा इस्पितळात वेदना भोगून चिंतातूर चेहऱ्याने मरण पावतो. वॉर्ड बाहेर सगळे आवराआवरीच्या तयारीला लागतात. केलेल्या इन्शुरन्सचं, रिटायरमेंट प्लॅनचं काय होतं माहीत नाही, करणारा त्या सगळ्याच्या पल्याड गेलेला असतो. वाडवडिलांच्या मातीपासून शेकडो किलोमीटर दूर कुठेतरी याला अग्नि देतात, आणि संपतं एकदाचं. आयुष्यात काय केलं तर अमुक एवढं तोळे सोनं ..read more
Visit website
आजही अशी कशी
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
हूरहूर भासते आजही अशी कशी! अजूनही चांदवा, पोचतो अंगणी, अंगणात चांदवा, काळजात चांदणी. लुकलुक डोळीयांत आजही अशी कशी, हूरहूर भासते आजही अशी कशी ! पावले ओलावली, भरती उधाणली, उधाणली ओल ही, पावलात सांडली. हूळहूळ पावलांत आजही अशी कशी, हूरहूर भासते आजही अशी कशी! ओढता दार ती, पळभर थांबली, थांबल्या दारास मी, चंद्रकोर टांगली, सुनसून चांदरात आजही अशी कशी, हूरहूर भासते आजही अशी कशी! खुळावतो मेघही, धरतीची आसही, आसावल्या मेघाची, तुझ्या मनी गाजही, छुनछुन नादते आजही अशी कशी, हूरहूर भासते आजही अशी कशी! तशीच तू, तसाच मी, माझ्यात तू, नाही तशी, कुजबूज अंतरी आजही अशी कशी, हूरहूर भासते आजही अशी कशी! - प्रसाद सा ..read more
Visit website
कलाकाराची एक्झीट
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
हे जग हा रंगमंच आहे रंगमंचच प्रत्येकाची आपली संहिता प्रत्येकाच्या भूमिका वाटून दिलेल्या प्रत्येकाच्या संहितेत प्रत्येकाची भूमिका वेगळीच चेहरे रंगतात चेहरे मुखवटे धारण करतात चेहरे खरे वाटतात खऱ्यापेक्षा बरे वाटतात एंट्री आणि एक्झीट ठरलेली याच्यामध्ये नेमकं काय घडतं त्यावर सगळा खेळ एंट्रीच्या भितीवर दामटून बसलेली बेभानी संहितेच्या पानांना संवेदना द्यायचं भान चेहऱ्यावर पडलेला प्रसिद्धीचा क्षणभंगुर झोत अंधारासमोर स्वप्नांनी चोपलेलं निशब्द शब्दाचं स्वगत सारं आठवतं एक्झीट झाल्यावर टॅक्सी करू म्हणता म्हणता हॉल्सच्या गोळीचा रस गिळत बसची वाट पाहत बसायचं खिशातल्या नाईटचे पैसे पूर्ण शाबूत रहावेत म्हणून त ..read more
Visit website
याला काय म्हणावे?
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
ती समोरून येताना धडधड धडधड व्हावे मनमोराने  मनमुराद थुईथुईसे नाचावे कुणीतरी गोमट्या भामट्याने करावी थोडी लगट तीनंही लगेच द्यावी साथ स्वतःशीच हसत मग काय? उपटसुंभाने मनमोरास पुरते भादरावे याला काय म्हणावे? ट्रेन रिकामी दिसता  आम्ही घ्यावे जरा शिरून स्वतःलाच देत दाद बसावे पसरून वातावरण हवेशीर फर्स्ट क्लास व्हावे निवांतपणाचे जरा उरात दोन श्वास भरावे ब्यागेतून सहजसोपे पाडगांवकर निघावे मग काय? कारण नसता ट्रेनने उलटे यार्डाकडे सुटावे याला काय म्हणावे? पाकीट असता अशक्त दिसावी सेलची पाटी सगळे ब्र्यांडेड कपडे  अन् अनब्र्यांडेड माणसांची दाटी हवाहवासा नग मिळायला  ..read more
Visit website
तू जुनी जुनीशी
चुरापाव
by प्रसाद साळुंखे
1y ago
तू  जुनी जुनीशी आठवू लागलो नवी नवी जशी छबी तुझी भासवू लागलो गार वारा पान माझे पावसाळी भान माझे रंग ओलेकंच चेतवू लागलो नवी नवी  जशी  छबी तुझी भासवू लागलो तो किनारा लोटलेला रोखलेला श्वास माझा घाव हे मखमली कातरू लागलो नवी नवी जशी छबी तुझी  भासवू लागलो थेंब पाचू या सरीचा वाजे वेणू अंतरीचा हवीहवीशी स्पंदने थोपवू लागलो नवी नवी जशी छबी तुझी  भासवू लागलो मेघ काळा व्यापलेला ताणलेला वेडचाळा गुंतूनी गुंतणे सोडवू लागलो नवी नवी जशी छबी तुझी  भासवू लागलो तू  ..read more
Visit website

Follow चुरापाव on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR