फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आद्याक्षर: ‘अ’.
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
23h ago
फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आजही वापरात असलेले शब्द. आजचे आद्याक्षर आहे: ‘अ’.  1. अक्कल     • फारसी मूळ: عقل (Aql)     • मराठी अर्थ: बुद्धी, समजूत 2. अदब     • फारसी मूळ: ادب (Adab)     • मराठी अर्थ: शिष्टाचार, विनय 3. अमल     • फारसी मूळ: عمل (Amal)     • मराठी अर्थ: कृती, कार्य 4. अमीर     • फारसी मूळ: امیر (Amir)     • मराठी अर्थ: श्रीमंत, धनवान 5. अदालत     • फारसी मूळ: عدالت (Adalat)   &nb ..read more
Visit website
जिज्ञासा
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
23h ago
संगणक तंत्रज्ञानाची पुढची आणि सर्वात अद्ययावत पायरी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान होय. मागच्या दशकातच या तंत्रज्ञानाने जगावर पाय रोवायला सुरुवात केली आणि आज ते सर्वच क्षेत्रांमध्ये अधिराज्य गाजवायला सज्ज झालेले आहे. अर्थात यातून कलाक्षेत्र देखील सुटलेले नाही. सृजनशीलता हा मानवाचा पायाभूत गुण आहे. परंतु हा गुणसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेने हळूहळू आत्मसात करायला घेतल्याचे दिसते. याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मराठीमध्ये लिहिले गेलेले हे पहिलेच पुस्तक, “जिज्ञासा”. तंत्रज्ञान म्हणजे इंग्रजी. हेच समीकरण सर्वांना पक्के ठाऊक असते. परंतु आज तंत्रज्ञान क्षेत्राम ..read more
Visit website
मातृभाषा बदलण्याचे फॅड
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
4d ago
इतिहास असं सांगतो की प्रत्येक भाषेला स्वतःची किंमत असते. किंबहुना ती किंमत ती भाषा बोलणाऱ्यांनी ठरवलेली असते. कधीतरी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. मागील दोन हजार वर्षांच्या भाषिक इतिहासामध्ये डोकावलं की कळतं की प्रांताप्रांतागणित भाषा बदलत गेल्या. एका भाषेवर दुसऱ्या भाषेचा प्रभाव दिसून आला. शिवाय भाषांमधील आदान प्रदान देखील होत गेले. विविध भाषिकांच्या मानसिकतेमुळे काही भाषा लयास गेल्या. आणि या पुढील काळात देखील त्या जाऊ लागतील. दुसरी भाषा आपल्यापेक्षा श्रेष्ठ. आणि ती बोलली की आपल्याला भरपूर पैसा मिळेल मान मिळेल अशी अनेकांची समजूत असते. यातूनच भाषेचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आज भारतीय समाजाची म ..read more
Visit website
अर्ली इंडियन्स
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
4d ago
ऐतिहासिक कालखंडामध्ये जितके आपण मागे जात राहतो तितके पुरावे क्षीण आणि दुर्बल होऊन जातात. मग अशा इतिहासाची मांडणी करताना संशोधकांचा कस लागतो. यातून नवनव्या संशोधनपद्धती विकसित होतात. तर्कपद्धतीचा अवलंब केला जातो. आणि इतिहासाची मांडणी होते. भारतीयांचा ज्ञात इतिहास अडीच हजार वर्षांपासून सुरू होतो. बौद्ध-जैन धर्माचा उदय आणि मौर्य साम्राज्याची स्थापना इथून भारतीय इतिहास सुरू होतो, असे म्हणतात. परंतु भारतामध्ये पहिल्या बुद्धिमान मानवाचे अर्थात होमो सेपियन्सचे आगमन सुमारे ६५ हजार वर्षांपूर्वी झाले होते. मग या उरलेल्या ६२ हजार पाचशे वर्षांमध्ये नक्की काय झाले? याचा शोध घ्यायचा असल्यास आज उपलब्ध असलेल् ..read more
Visit website
हो चि मिन्ह
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1w ago
विसाव्या शतकामध्ये देशादेशांमधील लढायात अनेक घटना घडल्या. जगामध्ये दोन महायुद्ध झाली. परंतु कोणत्याही महायुद्धामध्ये थेट सहभाग न घेतल्याने अमेरिका प्रगतीच्या पायऱ्या चढू लागली, असं म्हणतात. हळूहळू त्यांना वर्चस्वाची नशा चढू लागली. आणि याच कारणास्तव बहुतांश देशांवर राज्य करण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. परंतु अन्य देशांवर हल्ला करत असताना काही देशांनी अमेरिकेला देखील जेरीस आणले होते. त्यातील पहिला देश म्हणजे क्युबा आणि दुसरा व्हिएटनाम. व्हिएटनाम या देशाने गनिमी कावा अर्थात गुरिल्लावॉरचे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतले, असे अनेक लेखक लिहितात. याविषयी निश्चित माहिती नाही. पण या तंत्राचा वा ..read more
Visit website
सीबीएसई आणि महानगरपालिका
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1w ago
मराठी भाषेतील शिक्षण म्हणजे अतिशय फालतू आणि दुय्यम दर्जाचं, अशा अंधश्रद्धा मागच्या काही वर्षांपासून वेगाने फोफावत आहेत. आणि आता शासकीय यंत्रणा देखील त्याला पद्धतशीरपणे खतपाणी घालताना दिसत आहेत. पैशावाल्याचं पोरग इंग्रजीतून शिकणार आणि गरिबाचं पोरगं मराठीतून शिकणार, ही समाजाची मानसिकता बनत चाललेली आहे. मातृभाषेतील शिक्षण केव्हाही श्रेष्ठच जे हृदयापर्यंत भिडतं असं जवळपास प्रत्येक भाषा तज्ञाचे मत आहे. परंतु आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही. वारेमात पैसा ओतून मिळवलेलं सीबीएसईतील इंग्रजी भाषेतील शिक्षण म्हणजेच श्रेष्ठ, असं अनेकांना वाटतं. त्यातूनच आता महानगरपालिका देखील तथाकथित गरीब मुलांसाठी इ ..read more
Visit website
जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1w ago
प्रत्येक शतकाचा कालखंड हा वेगवेगळ्या घटनांनी तसेच निरनिराळ्या साम्राज्यांच्या इतिहासकथांनी व्यापलेला आहे. या प्रत्येक कालखंडामध्ये निरनिराळ्या देशांनी, संस्कृतींनी आपला ठसा उमटवला. कोणताच एक देश अथवा खंड सातत्याने जगावर राज्य गाजवू शकला नाही किंवा तेथील साम्राज्यांनी वाटसरुंनी अथवा बुद्धिमंत्तांनी देखील सातत्याने एकाच प्रदेशातून प्रगती केली नाही. आज जरी युरोप-अमेरिकासारखे खंड प्रगतीच्या वाटेवर पहिल्या स्थानावर असले तरी कोणी एकेकाळी आशिया खंड म्हणजे जगाच्या समृद्धीचा आणि भरभराटीचा प्रदेश होता. त्याचीच गोष्ट सांगणारा हा ग्रंथ म्हणजे डॉ. स्टुअर्ट गार्डन लिखित ‘जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं’. माध्य ..read more
Visit website
साहित्यिकांची वंशज आणि इंग्रजी
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1w ago
मागच्या आठवड्यामध्ये बहुतांश मराठी वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. मराठीतील एका सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या वंशजाने लहान वयातच स्वतःचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित केला. आणि त्याचे भरभरून कौतुक अनेक मान्यवरांकडून करण्यात आले होते. ही बातमी वाचून अतिशय वाईट वाटले. आपल्या मराठी भाषेला ज्यांनी समृद्ध केले त्यांचेच वंशज आता इंग्रजीची कास धरण्यास व्यस्त होत आहेत. मायबोलीची वाट सोडून स्वतःला ग्लोबल सिद्ध करण्यासाठी आंग्लभाषेची गोडवी गात आहेत. ही बाब कोणत्याही मराठीप्रेमीसाठी निश्चितच  ..read more
Visit website
राष्ट्रभाषेचं गुणगान
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
3w ago
“हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही तर केवळ अधिकृत भाषा आहे.” असे परखड आणि खरे मत नुकताच निवृत्त झालेला भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केले. आणि त्याचबरोबर समाजमाध्यमांवर याविषयी विविध प्रतिक्रिया प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. या प्रतिक्रियांद्वारे भारतीय जनमानस ‘राष्ट्रभाषा’ या संकल्पनेला कोणत्या दृष्टीने पाहते, याचा निश्चितपणे प्रत्यय आला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीनही प्रकारच्या वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिली. त्यांनाही माहित होते की, या बातमीला मोठ्या प्रमाणात लाईक, शेअर्स आणि कमेंट्सचा पाऊस पडणार आहे. आणि झाले देखील तसेच. मर ..read more
Visit website
पसायदान
विज्ञानेश्वरी
by Tushar B. Kute
1M ago
मराठीतील दुर्लक्षित असलेल्या ‘घुमा’ या चित्रपटामध्ये संत ज्ञानेश्वरांचे पसायदान एका वेगळ्या रूपामध्ये ऐकायला मिळते. पाश्चिमात्य संगीत आणि मराठी बोल यांचा सुरेख संगम या गीतामध्ये झालेला आहे. ऐकताना हे संगीत भावनिक करून सोडते. ज्ञानेश्वरांची ही विश्वप्रार्थना खरोखर वेगळ्या रंगात ऐकायला मिळणे, हा एक सुंदर अनुभव आहे. युट्युबवर याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. एकदा डोळे बंद करून ज्ञानोबांचे हे आगळे पसायदान नक्की ऐका…. https://www.youtube.com/watch?v=-hzWI_WthUw  ..read more
Visit website

Follow विज्ञानेश्वरी on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR