हैदराबाद विजय ?
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
1w ago
सध्या सगळीकडे एप्रिल पासून सुरु होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे. बहुधा भारतातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक घरात सध्या या निवडणुकांची आणि त्यान्वये होणाऱ्या राजकारणाची चर्चा करीत असणार. लोकसभेच्या एकूण ५४३ जागा जरी असल्यात तरी प्रत्येक जागा सारखी नसते. वायनाडच्या जागे कडे सगळ्यांचे लक्ष असणार तसेच वाराणसीला श्री मोदी किती मतांनी जिंकणार याच्या कडेहि सगळ्यांचे लक्ष असणार. या दृष्टीने बघितले तर या वर्षी हैदराबाद शहराच्या लोकसभेच्या जागेला पण नवीन महत्व प्राप्त झाले आहे. या जागेवर सन २००४ पासून श्री असाउद्दीन ओवेसी जिंकून येत आहेत. आणि त्याआधी या जागेवर सन १९८४ पासून श्री ओवेसी यांचे ..read more
Visit website
मराठी स्वातंत्र्य समर १६८२ ते १७०७ - धोरणे, लढे, डाव-पेच आणि तत्सम इतिहास (चंद्रप्रकाशी लेखन)
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
3w ago
**या लेख मालिकेला मी चंद्रप्रकाशी अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. सेतू माधवराव पगडी लिखित इतिहासाचे पुनर्मुद्रण सध्या वाचतो आहे. त्यातील संशोधन अजून संक्षिप्तात मी येथे मांडितो आहे. त्यांच्या सूर्यरूपी संशोधन आणि लेखनाच्या प्रकाशाचे हे चंद्रदर्शन.  ..read more
Visit website
भाजप आणि श्री मोदी यांची तिसरी वारी
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
1M ago
लोकसभा निवडणुकांचे वारे आता सोसाट्याने वाहायला लागले आहे. तारखा मागल्या आठवड्यात जाहीर झाल्यात पण तयारी मात्र सगळीकडे कधीचीच सुरु झालेली आहे. भाजप ने दोनशेच्या वर उमेदवारांची यादी जाहीर पण केली. काँग्रेसने सुद्धा ४०च्या आसपास उमेदवाऱ्या जाहीर केल्यात. हळू-हळू प्रादेशिक पक्ष आपले उमेदवार याद्या जाहीर करू लागल्या आहेत. गठ-बंधनाच्या बोलण्या सगळीकडे चालू आहेत. यातील काही, जसे भाजप व आंध्र प्रदेशचा प्रमुख विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टी यांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस आणि तामिळनाडूचा मुख्य पक्ष डीएमके याचे गठबंधंन पक्के झाले आहे.  ..read more
Visit website
स्वातंत्रोय्त्तर भारताची रत्ने
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
2M ago
मोदी सरकारने नुकतेच पाच विशेष व्यक्तींना भारत रत्न प्रदान केलेत. या पैकी श्री अडवाणी यांना भारत रत्न दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सन १९४७ नंतरच्या फाळणी नंतर आणि भीषण हिंदू संहार नंतर श्री अडवाणी आणि त्यांचे परिवार भारतात आले. आणि तेथून रथ यात्रे पर्यंत आणि नंतर भारताचे गृह मंत्री आणि मग पुढे भारताचे उप-पंतप्रधान पर्यंतचा श्री अडवाणी यांचा प्रवास स्फूर्तिप्रद आहेच. तसेच त्यांचा प्रवास हा भारताचा पण प्रवास म्हणू शकतो. श्री नेहरू यांच्या कारगीर्दीपासून स्वतःच्या ओळखी पासून दूर गेलेला भारत जणू श्री मोदी यांच्या कारगीर्दीत परतला आहे. आणि या परतीच्या प्रवासाचे एक मोठे श्रेय श ..read more
Visit website
महाराष्ट्र कुणाचा?
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
3M ago
जवळपास दहा वर्षांपूर्वी मी 'महाराष्ट्र कुणाचा?" या मथळ्याचा लेख या ब्लॉग वर लिहिला होता. तेव्हा हि राष्ट्रीय निवडणूक झाल्या होत्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजप ला भरगोस यश प्राप्त झाले होते. पण शिव-सेनेने घेतलेल्या डळमळत्या पावित्र्याने भाजप सरकार डळमळीत पायावर उभे होते. मी तो लेख, राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र कोणाचा अश्या आशयाचा लेख लिहिला होता. आज एका दशकाने मी पुन्हा याच मथळ्याचा लेख लिहितोय पण आशय वेगळा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांनी राजकारणाचा इतका उच्छाद मांडला  आहे कि महाराष्ट्रातील जनतेचा जणू कोणीच तारणहार उरलेला नाहीं असे मला वाटू लागले आहे.  ..read more
Visit website
'दिठी' - एक प्रवास
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
4M ago
"मरतांना पण आम्ही विठ्ठल, विठ्ठल करतच मरणार, पण माझ्या लेकाला हे पण बोलायचं अवसर मिळाला नाहीं"  तरुण पोराचा अचानक झालेल्या मृत्यूने कावलेल्या, जीव कासावीस झालेल्या, दुःखाने जर्जर बापाचे हे बोल हृदय कातरत जातात. दुख्ख बऱ्याच प्रकारची असतात पण आई-बापाने आपल्या अपत्याचा अंतिम संस्कार करणे हि दुख्खाची परिसीमा मानल्या जाते. 'दिठी' सिनेमात या त्रासाची भीषणता बोचते. पण हा चित्रपट एकांगी  नाहीं. केवळ पुत्रवियोगाच्या घटनेचे चित्रण नाहीं. हा एक प्रवास आहे. आणि या प्रवासाचा एकच रस्ता पण नाहीं. विठ्ठल भक्तीचा, त्याच्यावरच्या भाबड्या प्रेमाचा, त्याच्यावरच्या रागाचा, रागापोटी विठ्ठलास  ..read more
Visit website
तेलंगणाच्या निवडणुकीच्या पानांचे वादळ
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
5M ago
नुकतेच भारतातील चार राज्यात निवडणुका झाल्यात. पुढल्या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडुणकांची चाहूल या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये मिळेल अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. त्यात थोडे तथ्य आहे पण सामान्य मतदार राज्य सरकार आणि केंद्र सरकार ला वेगळ्या भिंगाने बघतो. पण प्रत्येक राज्य आणि तेथील मतदार वैशिष्ट्यपूर्ण असतात. आणि त्यामुळेच प्रत्येक राज्यात राजकीय पटल ही वेगळे असते. मध्य प्रदेशात काँग्रेस दुर्बळ नाहीं पण तरी गेली वीस वर्षे सातत्याने भाजप चे सरकार आहे. राजस्थान मध्ये काँग्रेस आणि भाजप तुल्यबळ आहे पण दर पाच वर्षांनी तिथे सत्तांतर होते. छत्तीसगढ मध्ये नेहमी दोन-चार सीट्स चा फरक असतो.&nbs ..read more
Visit website
नेते हवेत, राजकारणी नको. देव हवेत देवळं नकोत.
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
5M ago
आमच्या घरामागे एक नवीन देऊळ बांधले गेले आहे. तशी आस पास बरीच देवळं आहेत. पण हे झगमगीत आणि भव्य आहे. त्यामुळे सहाजिकच त्यावरचे भोंगेहि मोठे आहेत आणि सकाळ संध्याकाळ नुसता गोंधळ चालतो भोंग्यांवर. त्यांना आवाज कमी करण्यासाठी बऱ्याचदा विनंती केली. पण इथल्या कोण्या 'दादा' च आहे.ते देऊळ हे आराधना करायला शांती स्थळ असावे असल्या 'चुकीच्या' कल्पना त्या दादाला नाहीत. दिवे, रोषणाई, मंडप आणि भोंग्यांवर आवाजाचे प्रदूषण यातच त्याला महात्म्य वाटते. पण विचार केला तर असल्या धांगड-धिंग्याच्या कल्पना या 'दादा' च्या आहेत असे नाहीं. बहुतांश समाजाच्या असल्या कल्पना होऊन बसल्या आहेत. देवाची आराधना हि एक अति-वैयक्तिक ..read more
Visit website
मनोहर - भाग २
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
6M ago
**या कथेचा पहिला भाग मी २०११ ला लिहिला होता. तेंव्हापासून या गोष्टीचा शेवट डोक्यात आहे पण लिहिण्याचा योग जुळला नाहीं. आता बारा वर्षांनी पुढला भाग पूर्ण केला आहे. आशा करतो वाचकांना भाग २ आवडेल. हा भाग वाचायच्या आधी कृपया पहिला भाग - https://marathimauli.blogspot.com/2011/09/blog-post.html  आधी अवश्य वाचावा हि विनंती.   ..read more
Visit website
'कट्यार काळजात घुसली' - चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण
रुद्र शक्ति
by Chinmay 'भारद्वाज'
7M ago
'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट बघण्याचा योग्य फार उशिरा आला. त्या चित्रपटाची  गाणी मी गेले कित्येक वर्षे नित्य नेमाने ऐकतोय. 'सूर निरागस हो' या स्तवनाने माझे अनेक दिवस अजूनही सुरु होतात. आणि कितीतरी संध्याकाळी मी 'मन मंदिरा' नित्य नेमाने ऐकतो. पण हा चित्रपट बघण्याची संधी मात्र कधी प्राप्त झाली नाही. माझा ठाम मत आहे कि इच्छा झाली म्हणून चित्रपट बघितल्या जात नाहीत. प्रत्येक चित्रपटाचे एक वेगळे व्यक्तिमत्व असते आणि त्या 'चित्रपट-पुरुषाची' इच्छा असेल तेंव्हा तो कलेचा आविष्कार बघण्याचा योग येतो.  ..read more
Visit website

Follow रुद्र शक्ति on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR