मनडोह
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
1w ago
आकाश पेटले होते त्या कातर संध्याकाळी अंतरात उमटत होत्या विरही कवितेच्या ओळी कासाविस गूढ उदासी चादर काळोखी वरती श्वासांची नुसती धडपड हृदयाच्या वेशीवरती व्याकुळ अस्वस्थ क्षणांच्या पलित्यांचे नृत्य सभोती संभ्रमात मनडोहाच्या खळबळ आगंतुक होती विवरात कृष्ण एकांती चाहूल कुणाची होती अंधार भेदुनी किरणे हलकेच उतरली होती भ्रम संभ्रम नैराश्याचे निमिषात वितळले होते तिमिरात गडद रात्रीच्या मन लख्ख उजळले होते जयश्री अंबासकर ..read more
Visit website
कुर्बान हम पे कुदरत हुई है
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
2M ago
हमको किसीसे उल्फत हुई है धरती बदलके जन्नत हुई है उनकी जरासी बस हां हुई है देखो दिवानी हालत हुई है  ..read more
Visit website
आधी ये तू
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
5M ago
मुक्त चांदणे विरघळण्याच्या आधी ये तू प्राजक्ताच्या दरवळण्याच्या आधी ये तू जखम केवढी जपतो झाकुन कौशल्याने खपली निघुनी भळभळण्याच्या आधी ये तू आठवणींनी पोखरलो आधीच केवढा मुळापासुनी उन्मळण्याच्या आधी ये तू रस्ता देखिल दमला चालुन माझ्या सोबत कंटाळुन तोही वळण्याच्या आधी ये तू मानत नाही कधीच कुठल्या अफवांना मी किडा संशयी वळवळण्याच्या आधी ये तू जयश्री कुलकर्णी अंबासकर ..read more
Visit website
सन्नाटा
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
9M ago
सन्नाटा ..read more
Visit website
सुख म्हणावे मी कशाला
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
9M ago
कोण जाणे काय होता शाप सुंदरशा घराला एक मोठा दोर होता टांगला त्याच्या छताला नक्र अश्रुंचा किती पाऊस अन् आक्रोश झाला मात्र माझ्या हुंदक्याचा खूप झाला बोलबाला रोज एखादी असावी वेदनाही सोबतीला त्याविना येणार नाही मोलही नुसत्या सुखाला वार झाले जीवघेणे ना कधी भांबावले मी फक्त एका सांत्वनेचा काळजाला भार झाला रूप सुंदर मानसीचे त्या क्षणी साकारण्याला हो विधात्यानेच छिन्नी घेतली घडवावयाला अंतरीच्या भावनांचा कोंडमारा फार झाला पावसाने साथ केली आसवे लपवावयाला मी सुखाला गाठण्याचा यत्न आटोकाट केला "काय व्याख्या तव सुखाची," प्रश्न पाठोपाठ आला जयश्री अंबासकर ..read more
Visit website
आजाद रातें
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
10M ago
सुनते सुनाते बतियाती रातें हौले से होती मदहोश रातें हां चांद भी तो बाहों में था तब होती थी कितनी धनवान रातें दिन भी खुशी से, थे जल्द ढलते तुम्हारे लिये थी बेचैन रातें होती कहां थी आजाद रातें लेती थी लेकिन इल्जाम रातें जीये जा रहा था तुम्हें गुनगुनाते हुई जा रही थी कुर्बान रातें गुमसुम हुई कब वो प्यारी सी बातें लगने लगी अब ये अनजान रातें लगती थी हमदर्द खामोश रातें अब क्यूं हुई है बेदर्द रातें ✍️जयश्री अंबासकर  ..read more
Visit website
सळसळते आहे
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
10M ago
जुने सोडुनी नव्या दिशेला वळते आहे दिशा मनाची पुन्हा नव्याने कळते आहे दोन विकल्पांमधेच उत्तर दडले होते प्रश्न सोडला म्हणुन अता हळहळते आहे थिजल्या होत्या काळजातल्या भावभावना आपुलकीच्या शब्दाने विरघळते आहे क्रूर नाट्य अनुभवले होते वात्सल्याचे स्पर्शदंश ते जुने तरी कळवळते आहे उभा ठाकला भूतकाळ साक्षात समोरी खपली निघुनी जखम पुन्हा भळभळते आहे छाटत जावे हात पाशवी समाजातले इच्छा असुरी मनामधे वळवळते आहे कडे कपारीतुनी जरी कोसळते आहे लाट मनाची उंचच उंच उसळते आहे अपुली त्रिज्या, व्यास आणखी परिघ ठरवला वर्तुळ व्यापुन आनंदी सळसळते आहे जयश्री अंबासकर  ..read more
Visit website
पण तो आता परका होता
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
10M ago
प्रसंग मोठा बाका होता मारेकरीच काका होता कळले आधी म्हणुन थांबला वळणावरती धोका होता पावसातली भेट अचानक पण तो आता परका होता त्याच्यासाठी काळजातला चुकला माझा ठोका होता जखम लागली पुन्हा भळभळू एक उसवला टाका होता जवळपास मी सदा रहावे एकच त्याचा हेका होता आनंदी आहेस ना अता? प्रश्नच त्याचा तिरका होता आयुष्याच्या संध्याकाळी परिसर ओकाबोका होता ✍️जयश्री अंबासकर ..read more
Visit website
त्याच्या माझ्यामधले काही
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
1y ago
चुकते आहे काय नेमके समजत नाही काय करावे, तेच नेमके उमजत नाही नात्यामधले काय नेमके बिनसत आहे त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे  नाते इतके तकलादू तर कधीच नव्हते त्याच्या माझ्यामधे दुरावे कधीच नव्हते तरी कशाने सोबत त्याची हरवत आहे त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे  हरवत आहे हसणे हल्ली त्याचे माझे मौनामधले झुरणे हल्ली त्याचे माझे दुनियादारी ऐसीतैसी निभवत आहे त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे  रुक्ष कोरड्या नात्यामधले क्षीण उसासे उगा द्यायचे खिन्न मनाला फक्त दिलासे आठवणींचे व्याकुळ मोहळ रडवत आहे त्याच्या माझ्यामधले काही उसवत आहे  ..read more
Visit website
९६ व्या अखिल भारतीय संमेलनातला गजल मुशायरा
गूढ माझ्या मनीचे !!
by जयश्री
1y ago
 ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन... कविवर्य सुरेश भट गज़लकट्टा... सन्माननीय व्यासपीठावरचा गज़ल मुशायरा... शिस्तबद्ध नियोजन .... अत्यंत प्रतिभावान गज़लकारांसोबत व्यासपीठावर गज़ल सादर करायला मिळणं... समोर असलेले दर्दी रसिक ... मिळणारी उत्स्फूर्त दाद, गोपालचं जबरदस्त सूत्रसंचालन... गज़ल सादर करताना खूप समाधान मिळालं... #९६वे_अखिल_भारतीय_साहित्य_ ..read more
Visit website

Follow गूढ माझ्या मनीचे !! on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR