कावळा
पु.ल.प्रेम
by Pula Prem
2d ago
पशुपक्ष्यांत ज्या काळी मन रमायचे त्या वेळी रमले नाही, आणि आता वेळ निघून गेली. माझ्या शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा! माझे बालपण शहरात गेल्याचे मला दुःखही नाही, तसेच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचेही नाही. "कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा," अशी आम्हांला एक कविता असे. लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत, बालगीत नव्हे. कावळा आम्ही रोजच पाहत होतो. पण सफेत बगळा मात्र भारताला ..read more
Visit website
मण्यांची माळ - एक विचारमंथन (तन्वी राऊत)
पु.ल.प्रेम
by Pula Prem
4d ago
“आयुष्यात एका आवडत्या लेखिकेला भेटायची संधी तुला देवाने दिली तर तू कुणाला भेटशील?” असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर सर्वप्रथम सुनीताबाई देशपांडेंचंच नाव माझ्या मनःपटलावर तरळून जाईल यात शंका नाही. त्यांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, हाती घेतलेलं काम तडीस नेण्यासाठी त्यात झोकून देण्याची वृत्ती हे गुण तर सर्वश्रुत आहेतच. पण त्यांबरोबरच आजबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे बारकावे टिपण्याची सवय, स्वतःतील ..read more
Visit website
सबकुछ पु.ल. - (अनिल हर्डीकर)
पु.ल.प्रेम
by Pula Prem
4d ago
मराठीत साहित्यक्षेत्रात विनोदी लेखक म्हणून प्रचंड झालेले पु.लं. देशपांडे आणि विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या शरद तळवळकर यांची वसंत सबनीस यांच्या साक्षीने घडलेली ही भेट.पु. ल. देशपांडे यांचे नाव माहीत नाही असे सांगणारा मराठी माणूस मिळणार नाही. 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' असा अत्यंत कमी शब्दांत त्यांचा पूर्ण परिचय केला जातो. पुलंनी जेवढे विपुल लेखन केले त्यापेक्षा काकणभर जास्तच ..read more
Visit website
अशी ही बनवाबनवी आणि पु. ल.
पु.ल.प्रेम
by Pula Prem
6d ago
मराठी सिनेसृष्टीची अजरामर कलाकृती म्हणून अशी ही बनवाबनवी चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन कित्येक वर्षे लोटली, तरीही अद्याप प्रेक्षकांवरील चित्रपटाची जादू तीळमात्रही कमी झालेली नाही. या चित्रपटाची गाणी आजही तितक्याच उत्साहात लावली जातात. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक संवाद हा प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहे. त्यामुळेच की काय कधीही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी प्रेक्षकांना तो ..read more
Visit website
असा मी... असा मी (उरलंसुरलं)
पु.ल.प्रेम
by Pula Prem
1M ago
पूर्ण नाव : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडेपत्ता : पुणे ४ (एवढ्या पत्त्यावर पत्र येतं . सगळा पत्ता दिला तर पाहुणे! पुणेकर सुज्ञास अधिक काय सांगावे?)शिक्षण : शाळा कॉलेजात गेलो पण ' शिक्षण ' झाले असे ठामपणे म्हणता येणार नाही .व्यवसाय : सुशिक्षित बेकार फावल्या वेळचे छंद : मुख्य छंद , झोप काढणे .वेळ उरल्यास अधिक झोप काढणे महत्वाकांक्षा काय होती : प्रथम , कोहिनुर सिनेमाचा डोअरकीपर ! नंतर फिल्म सेन्सॉर ..read more
Visit website
ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना !
पु.ल.प्रेम
by Pula Prem
1M ago
चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी लिहिलेली ही कविता. याच कवितेचं नंतर अत्यंत प्रसिद्ध असं गाणंही झालं. ह्रदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं हे गीत, आशा भोसले यांनी खरोखरच असं गायलं आहे की तेस्वरांचे घन येऊन आपल्या मनाला न्हाऊ घालतात प्रत्येक वेळी ऐकताना.पण मुळात ही कविता आणि ती लिहिण्यामागची पार्श्वभूमी दोन्ही अतिशय उदात्त अशी आहे. एकूणच काव्य, कवी आणि कलाकार या सर्वांसाठीच या कवितेचं स्थान ..read more
Visit website
अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना
पु.ल.प्रेम
by Pula Prem
3M ago
शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं 'माणसाचं आयुष्य किती?' माटेंचं उत्तर होतं, "माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं...!" या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी ! ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात उच्च दर्जाची मुशाफिरी केली व रसिकजनास न्हाऊन काढलं!एकदा नांदेडच्या नाट्यसंमेलनात आचार्य ..read more
Visit website
पुणेरी 'दुकानदार
पु.ल.प्रेम
by Pula Prem
4M ago
पुणेरी 'दुकानदार' हा अपुणेरी मंडळींच्या टीकेचा आवडता विषय आहे. आर्थिक फायदा हा मुळी पुणेकर दुकानदाराचा मूळ हेतूच नसतो. 'गिन्हाईक' हा आपला निष्कारण वेळ खायला येणारा प्राणी आहे, ह्या तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास आहे. 'गि-हाइकाचं म्हणणं खरं असतं' हा जागतिक व्यापाऱ्यांचा सिद्धान्त झाला. पण पुणेकर दुकानदाराचा सिद्धान्त, 'दुकानदाराचं म्हणणंच खरं असतं' असा आहे. गि-हाईक पटवण्यापेक्षा कटवण्यातला आनंद ..read more
Visit website
मी आणि पु.ल. - (सई ललित)
पु.ल.प्रेम
by Pula Prem
5M ago
मी आणि पु.ल आमच्यामधे एक सहृदयतेचा पुल मी दहा बारा वर्षाची असताना बांधला गेलाय.तो एवढा मजबूत आहे की मी मरेपर्यंत तो टिकेलच.पण त्या पुलावरुन माझी मुलं नातवंडं पण आरामात आवडीने जातील .याची खात्री वाटते. कदाचित पुढच्या पिढीचं वाचन कमी होईल.कारण त्यांची त्रोटक वाचायची सवय डेव्हलप झालीय. मग त्यासाठी पुलंच्या आॕडीओ कॕसेट आहेत.व्हिडीओ आहेत.ते इतके सुंदर आहेत की आपल्याला वेगळ्या काळात खेचून न्यायचं ..read more
Visit website
मनोहरी आठवणी - (डॉ. वीरेंद्र ताटके)
पु.ल.प्रेम
by Pula Prem
6M ago
सुनीताबाई या पुलंच्या पत्नी म्हणून सर्वाना परिचित होत्याच . मात्र त्या स्वतः सिद्धहस्त लेखिका होत्या . त्यांचे ' आहे मनोहर तरी ' हे पुस्तक मी १९९२ या वर्षी कॉलेजमध्ये शिकत असताना वाचले होते. त्यानंतर त्यांना लिहलेल्या पत्राला त्यांनी लगेच पत्राने उत्तर दिले होते .पुलंच्या निधनानंतर सुनीताबाई मनाने आणि शरीराने खचल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं लिखाण आणि पुलंच्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन ..read more
Visit website

Follow पु.ल.प्रेम on FeedSpot

Continue with Google
Continue with Apple
OR